#Varvand:मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात आरोग्य तपासणी ला भरपूर प्रतिसद


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांनी दिलेल्या आदेशानुसार,मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केलेल्या सूचनेनुसार  ३ डिसेंबर २०२३ रोजी सर्व महाराष्ट्रभर आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. तालुक्यातील शिबिराची जबाबदारी त्या तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि तालुका पदाधिकारी यांनी समर्थपणे पेलली.

यामध्ये पुरंदर तालुका पत्रकार संघ- ३५, आंबेगाव तालुका पत्रकार संघ ६८, इंदापूर तालुका पत्रकार संघ- २५, बारामती तालुका पत्रकार संघ २२, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण १५,  पिंपरी चिंचवड पत्रकार संघ ८५,दौंड तालुका पत्रकार संघ १२, जुन्नर तालुका पत्रकार संघ २०,हवेली तालुका पत्रकार संघ २४  पत्रकारांची तपासणी झाली.४ डिसेंबर रोजी  शिरूर तालुका पत्रकार संघ व भोर तालुका पत्रकार संघ, वेल्हे तालुका पत्रकार, संघ ,पुणे शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर पत्रकार संघ येत्या आठवड्यामध्ये पत्रकारांची तपासणी करून घेणार आहेत.आरोग्य शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत