#Chiplun:चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील धामापूर जि.प.गटातील उबाठाच्या पदाधीकारी व कार्यकर्तेचा सावर्डे येथे आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश

तुमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ विकास कामे करण्यासाठी बळ देते- आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर जिल्हा परिषद गटातील जनसमुदाय सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकवटला होता. त्यामुळे एक नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व ग्रामस्थ निकम सर यांच्यावर कमालीचे खुश होते. त्यांचा संवाद, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन व गरज लक्षात घेऊन तातडीने सोडवण्याची पद्धत यासर्व गोष्टी आदर्शवत आहेत. हे सर्व ग्रामस्थांच्या डोळ्यात दिसत होते. आमदार शेखर निकम यांचे कार्यालयात आगमन होताच त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. अन पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उत्सहाच्या शिगेला पोचला आणि आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन धमापूर जि. प.  गटातील उबाठाचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) मध्ये प्रवेश केला.

प्रवेशकर्त्यांमध्ये धामापूर जि.प.गटातील उठबाचे तुकाराम मेस्त्री (शिवसेना शाखाप्रमुख),माजी सरपंच दत्ताराम भायजे,शाखाप्रमुख गांगाराम भायजे,पडयेवाडी गावकर सजंय पडये,बोलेवाडी गावकर मधुकर बोले,पडयेवाडी माजी अध्यक्ष निलेश पडये,विजय पडये,भुसेवाडी महेंद्र कांबळे,रमेश भायजे,दिनेश पडये,रघुनाथ बोले,प्रकाश पवार,यशंवत पवार,विनोद भायजे,दत्ताराम बेंडके,तुकाराम बेंडके,पुर्ये तर्फे सावर्डे गावतील सरपंच विष्णू मांडवकर, शाखाप्रमुख शंकर घाडशी,पेवेवाडी वाडीप्रमुख बाबाजी इंजळे ,चांदाडेवाडी वाडीप्रमुख सहदेव पाडावे,गावकारवाडी वाडीप्रमुख यशंवत पाडावे,कळंबुशी उपशाखाप्रमुख प्रमोद चव्हाण,दत्ताराम म्हापरले,रमेश पवार,सुरेश आग्रे,प्रभाकर पवार,संदिप पवार,देवेंद्र चव्हाण यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व महिला यांचा समावेश आहे.
प्रवेशा दरम्यान प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम यांच्या कामाची प्रशंसा करत कोट्यावधी पेक्षा जास्त निधी विविध योजनेतून मंजूर करत जो ना भूतो ना भविष्यात न होणारा विकास गेल्या साडेचार वर्षात केला आहे. त्याचे प्रत्येकजन गुण गाण गात होता. व एक आदर्शवत असे राजकारणातील म्हणून सन्मान करत होता.
आमदार शेखर निकम यांनीसुद्धा सर्व प्रवेशकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करत प्रत्येकाने सामाजिक करत, आप - आपसातील वाद - विवाद बाजूला ठेवत पक्ष संघटना वाढविण्याच्या दुष्टीने प्रयत्न करावा असे सांगत मतदार संघाच्या विकासासाठी आपण बांदील आहोत अन ती माझी प्रथम जबाबदारी असेल असा जनसमुदायास शब्द दिला.

यावेळी जयंत खताते,दादा साळवी,रमेश राणे,राजेद्र पोमेडकर,राजेद्र सुर्वे,अबु ठसाळे,सुशिल भायजे,बंधू सुर्वे,मयुर बाष्टे,शेखर उकार्डे,शांताराम भायजे,दिपक जाधव,गजानन सुर्वे,अमित मचिवले,नाना कांगणे,अक्षय चव्हाण,सुबोध चव्हाण,शशिकांत घाणेकर,संतोष गोटेकर,अजिज आलेकर,दिपक शिगवण,शेरआलम खोत,लहू सुर्वे,शैलेश चव्हाण,सिद्धर्थ पवार,बबू कवळकर,पांडूरंग येलवंडे,शपी शहा,अंनत गोटेकर,नितीन भोसले,मंगेश बंडागले,बाळा पंदेरे,रामू पंदेरे,निलेश कदम,सचिन साडविलकर,डॉ रजित पाटील,अमित कदम,मनोज जाधव,सिध्देश लाड,सचिन पाटेकर,राहुल शिंदे,बाबु मोहिते आदी धामापूर गटातील पदाधीकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत