#Natepute:अभ्यास एके अभ्यास न करता पालकासह शिक्षकांनी मूलांच्या सर्वागीण विकासासाठी लक्ष द्यावे - संस्कृती राम सातपुते
महादरबार न्यूज नेटवर्क -
अभ्यास एके अभ्यास न करता शिक्षकांसह पालकांनी मूलांचा सर्वागीण विकास घडविण्यासाठी लक्ष द्यावे असे मत ऊर्जा फाऊडेशनच्या अध्यक्षा संस्कृती राम सातपुते यांनी व्यक्त केले.
येथील चंद्रप्रभू इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या प्रमूख पाहूण्या म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमहेंद्र दोशी होते.
पूढे बोलताना त्या म्हणाल्या कि,स्नेहसंमेलनम्हटले कि घराघरात धूम चालू असते,मूलांच्या विकासासाठी सर्वजण झटत असतात हि शाळा मूलांच्या सर्वागीण विकासा बरोबरच देशाचा नागरीक सर्वगूण संपन्न असावा यासाठी संस्कारक्षम शिक्षणावर भर देत आहे.पालकांनी,शिक्षकांनी मूलांना वेगवेगळ्या क्षेञाची माहीती देऊन संकटाचा सामना करायला पाहीजे.अपयशाने खचून न जाता त्याला सामोरे कसे जायचे यांचे ज्ञान देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बालचमूंनी विविधरंगी वेशभूषा परिधान करून विविध गाण्यांच्या तालावर नृत्य केले. लहान मुलांनी उत्कृष्ट नृत्य व ऐतिहासिक प्रसंग सादर केले.
प्रारंभी सरस्वती, सावित्रीबाई फुले, वर्धमान महावीर !राजमाता जिजाऊ माॅंसाहेब,यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन करून करण्यात आले, यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली प्रास्ताविक शितल ढोपे यांनी केले.
या कार्यक्रमास चंद्रप्रभूचे चेअरमन नरेंद्र गांधी, सेक्रेटरी विरेंद्र दावडा, व्हाइस चेअरमन वर्धमान दोशी, बाहूबली चंकेश्वरा,अतूल पाटील,माऊली पाटील,संजय गांधी, मनीष दोशी, रेवती चंकेश्वरा,सुप्रिया पाटील, गौरी पाटील, सारिका गांधी, वर्षा दावडा, अर्चना गांधी, नीलिमा गांधी, , मुख्याध्यापक शीतल ढोपे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment