महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
यवत येथील महालक्ष्मी विद्या प्रतिष्ठान संचलित किलबिल बालक मंदिर व किलबिल प्री - प्रायमरी स्कूल आयोजित ३ दिवसीय भव्य किलबिल आनंद मेळावा यवत विश्रामगृह जवळ असलेल्या शाळेच्या मैदानात नुकतेच संपन्न झाले, दप्तर मुक्त शनिवार उपक्रमाअंतर्गत किलबिल आनंद मेळावा घेण्यात आला.
सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव सर्जेराव जगताप, विद्या प्रसारक मंडळाचे अनिल जगताप, अंगणवाडी सुपरवायझर अस्मिता सस्ते उपस्थित होते.
या मेळाव्याचे उद्घाटन महालक्ष्मी विद्या प्रतिष्ठानच्या संचालिका सुनिता संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शितल दोरगे, कल्पना मेहर, चित्रा झिटे, काश्मीरा मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराज जगताप व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले व या उपक्रमाबाबत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या प्रगतीबाबत समाधानही व्यक्त केले. किलबिल आनंद मेळाव्यात परिसरातील भाजीपाला - फळे, पाककृती, व्यवसाय ओळख, व्यवहार ज्ञान, नवनिर्मिती, मनोरंजन आदी आनंददायी शिक्षणाची वैशिष्ट्ये अनुभवायला मिळाली. यावेळी भाजीपाला -फळे स्टॉल, शाकाहारी व मांसाहारी जेवण, चुलीवरचे पारंपारिक पदार्थ, विविध प्रकारचे स्नॅक्स, पोहे, इडली,भेळ,गुलाबजाम, जिलेबी, पाणीपुरी,समोसे आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल, सौंदर्यप्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी, हेड मसाज, हस्त कलाकृती , मनोरंजक खेळ यांसह २० हून अधिक स्टॉल लावण्यात आले होते. सदर मेळाव्याला ग्रामस्थांनी भेट देत मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडली.
या मेळाव्यात हजारो रूपयांची उलाढाल झाली. मेळाव्याचे आयोजन इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक सौरभ संजय जगताप, सेमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कैलास दौड, शिक्षिका वनिता शशिकांत वानखेडे, सारिका अजय देशमुख, प्रियंका शंतनु बच्चाव , सुषमा आगे, अमरीन तांबोळी यांसह शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी यांनी केले तीन दिवस चाललेल्या किलबिल आनंद मेळाव्याची दि १०रोजी रात्री ८ वाजता सांगता झाली.
0 Comments