महादरबार न्यूज नेटवर्क - पञकार दिनानिमित्त नातेपुते येथील श्रीदत्त सेवाभावी प्रतिष्ठानच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, समारंभाच्या व्यासपीठावर जेष्ठ पञकार विलास भोसले,आनंद जाधव तसेच सुनिलशेठ देशमुख, चांदभाई काझी, सुनिलजी मैड, कैलासशेठ सोनवणे,अमितजी चांगण उपस्थित होते यावेळी उपस्थित पञकार विलास भोसले, आनंद जाधव, समीर सोरटे,उमेश पोतदार,श्रीराम महाराजभगत , सुनिल गजाकस ,सनी बावीसकर,अभिजीत म्हामणे वैभव आठवले,ॲड.राजेंद्र पिसे ,सुनिल ढोबळे,हेमंत उराडे यांचा मान्यवर आणि संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी यांनी पत्रकारांना गुलाब पुष्प डायरी पेन देऊन सन्मान केला.
यावेळी स्वागत प्रास्तावकिय मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानचे सचिव नंदकिशोर धालपे म्हणाले पञकार बांधवाचे नातेपूतेच्या जडणघडणीतील मौलीक योगदान सर्वच क्षेञात मार्गदर्शनीय ठरत आहे चार स्तंभातील महत्वपुर्ण स्तंभ हा पञकारीतेचा असून त्याचे देशाच्या राष्ट्राच्या उभारणीत महत्वपुर्ण योगदान आहे ,यांनंतर विलास भोसले ,आनंद जाधव,समीर सोरटे यांनी विश्वस्थ मंडळाला शूभेच्छा देऊन मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेने दत्तजयंती सोहळा किर्तन,वृक्षारोपण,रक्तदान शिबीर आयोजित करून सामाजिक सेवेच्या वाटचालीस सुरवात केली त्याचे कौतुक केले आणि प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पदमन, उपाध्यक्ष शिवम उराडे, सहसचिव शक्ति पलंगे,खजिनदार रवींद्र ठोंबरे,विश्वस्थ संजय उराडे, संजय चांगण,रवी कोतमिरे,धर्मनाथ राउत,उमेश बरडकर,सागर लोंढे राहुल सोनवळ,अवी लिपारे आधी उपस्थित होते
0 Comments