Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat:स्वामी चिंचोलीत २८ वर्षापूर्वी चा वर्ग पुन्हा एकत्र आला


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दि. ७ रोजी .स्वामी चिंचोली ता. दौंड येथील एका हॉटेल मध्ये  सन १९९४ चा वर्ग पुन्हा एकत्र आला. या कार्यक्रमाचे निमित्त होते एक पोलीस मित्राचा  सेवानिवृती दुसरे पोलीस हवालदार श्रीयुत दत्तात्रय खुटाळे यांनी स्वेच्छेचा सेवानिवृत्ती घेतल्या बद्दल त्यांचा सेवानिवृत्ती सपत्नीक सत्कार समारंभ आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्रीयुत महेंद्र गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा.यावेळी ऐकुण ३० मुले-मुली ऐकत्र येऊन सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी .निवृत्त पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे यांना संपूर्ण पोशाख वर्गमित्र परिवारातर्फे भेट देण्यात आला.तसेच महेंद्र गायकवाड पोलीस हवालदार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली.


यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनिषा पोटफोडे- शेवाळे बोलताना म्हणाल्या की आपल्या (बँचचे) वर्गातील सर्वच मुले हे  नागरिक असून चांगली आहेत. आपण सतत काही ना काही कारणाच्या निमित्ताने एकत्र आले पाहिजे. आणि एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे.यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.हवालदार महेंद्र गायकवाड म्हणाले कीआपल्या वर्गमित्र परिवारामध्ये शक्य तितकी मदत करण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो आणि करत राहील. आणि माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.निवृत्त पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे म्हणाले की माझ्या प्रकृतीची किरकोळ अडचण असल्यामुळे आणि मला सेवानिवृत्ती नंतर राहिलेले पुढील वाटचालीत  आनंदी जगायचे आहे. मी सतत आनंद घेत असतो.आणि घेणार आहे. म्हणून मी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली आहे.आणि आपणही सर्वांनी या धकाधकीच्या काळात शरीर संपत्ती जपली पाहिजे. शरीर संपत्ती हिच आपली मोठी संपत्ती आहे. आपण सर्व वर्गमित्र एकत्र येऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तसेच आपल्या या वर्गमित्र परिवारांमधील कोणालाही कधीही काहीही अडचण आल्यास मला हक्काने आवाज द्या मी तुमच्या हाकेला नक्की साथ देईल.या ठिकाणी शेवटी हवालदार दत्तात्रेय खुटाळे यांनी सर्वांना गोड जेवण दिले.नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक अजित झांजुर्णे, खानवटे गावचे माजी सरपंच राजेंद्र झोंड, शहाजी नगरे, प्रविण खारतोडे, सतीश जराड, कैलास काळे, प्रमोद लोखंडे, यशवंत थोरात, मनिषा पोटफोडे- शेवाळे, निता देशमुख,शोभा काळे,आणि पत्रकार बबनराव धायतोंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments