महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव अनंत विभूषित जगदगुरु नरेंद्रचार्याजी महाराज यांचा समस्या व मार्गदर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रम हा विठ्ठल लाँस हिंजवडी गांव लक्ष्मी चौक मारुंजी रोड तालुका मुळशी जि. पुणे या ठिकाणी होणार आहे. गुरुवार दि. 11 रोजी सकाळी ठिक 9 वाजता जगदगुरुश्रीचे संतपिठावर आगमन झाल्यानंतर स्वागत समारंभ होईल. व त्यानंतर लगेच जगदगुरुश्रींच्या प्रवचनाला सुरुवात होणार आहे. सकाळी 11 नंतर दर्शन समस्या मार्गदर्शन सोहळ्यास सुरुवात होणार असून समस्या मार्गदर्शन सोहळा संध्याकाळ पर्यंत असणार आहे. शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी जगदगुरुश्रीचे संतपिठावर आगमन झाल्यानंतर सुरुवातीला आरती होईल. तसेच अमृतरुपी प्रवचन झाल्यानंतर समस्या मार्गदर्शन व दर्शन व तसेच त्याच दिवशी साघक दिक्षाचा कार्यक्रम होणार आहे. असा हा एकुण दोन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम होणार असून सदरील कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विविध जिल्ह्यातून गर्दी होणार आहे. दोन्ही दिवसाकरिता भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली असून मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जगदगुरु नरेंद्रचार्याजी महाराज संस्थान उपपिठ प. महाराष्ट्र पिठाचे पिठ प्रमुख श्री. संजय गाडेकर तसेच पीठ व्यवस्थापक श्री. सुधांशु जाधव यांनी केले.
संस्थाना मार्फत अनेक सामाजिक शिक्षणिक वैद्यकिय कृषीविषयक अनेक उपक्रम मागील अनेक वर्षापासून मोफत राबविले जातात. आजतागायत संस्थाना मार्फत महाराष्ट्रातील विविध हायवेवर एकुण 52 रुग्णवाहिका अपघातग्रस्त रुग्णांना मोफत सेवा देत असून आजपर्यंत या रुग्णवाहिकाच्या माध्यमातून 21,500 लोकांचा जीव वाचवला आहे. तसेच नाणिज येथे पदवीपर्यंत इंग्लिश माध्यमाची शाळा असून पदवीपर्यंत इंग्लिश माध्यामातून गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे.
वैद्यकीय उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत संस्थानाच्या पुढाकारामुळे एकुण 50 लोकांचे मरणोत्तर देहदान झाले आहे। तसेच ब्लड इन नीड या वैद्यकीय उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 20000 रुग्णांना मोफत रक्त देवून त्यांचे प्राण वाचविले. आहेत. संस्थांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम, शेक्षणिक , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पनर्वसन, महिला सक्षमीकरण, अपघात मदत कार्य विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत असून विविध सामाजिक कार्यात संस्थान नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे.
0 Comments