#Baramati:इंदापूर, बारामती , दौंड तालुक्यात क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांचे गाव भेट दौरे

बारामती लोकसभेच्या रिंगणात
स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या , चळवळीतील नेतृत्व समजल्या जाणाऱ्या कल्याणी वाघमोडे


महादरबार न्यूज नेटवर्क -
संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन असणाऱ्या बारामती तालुक्यातील  ढेकळवाडी गावातील इंजिनीयर , ग्रॅज्युएट पदवी प्राप्त अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या व क्रांती शौर्य सेनेच्या  अध्यक्ष कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विविध तालुक्यातील अनेक गावांना त्या भेटी देत मतदारांशी चर्चा करत संवाद साधत आहेत.


संपूर्ण महाराष्ट्रात सतत कार्यरत असणाऱ्या ,लोकांच्या जनसंपर्कात असणाऱ्या, जागृत लेखिका व परखड महिला नेतृत्व , सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वंचित घटक ,कष्टकरी लोकांसाठी आयुष्य समर्पित करून गेली २०वर्ष संघटनेच्या व चळवळीच्या माध्यमातून सामाजिक न्याय हक्कासाठी वाचा फोडणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचा संघर्ष मोठा आहे.

राजमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपतात . पुढील पिढीला हे विचार जपता यावेत म्हणून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या परखड शैलीतून ,भाषणातून आपले मत मांडत असतात. स्व. बी के कोकरे व स्व.गणपत (आबा) देशमुख यांना देखिल प्रेरणा मानतात.तसेच त्यांचा सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या कार्यामुळे चांगला संपर्क आहे .२०१९ मध्ये मराठवाडा विभागात शिवसेना पक्षातून स्टार प्रचारक म्हणून संघटनेचा पाठींबा देत कार्य केले होते. अनेक नेत्यांचे प्रचारात सहभाग दिला होता.
२०१९ च्या लोकसभा निवडणूक मधे वंचित बहुजन आघाडी तर्फे धनगर ओबीसी महिला चेहरा म्हणून त्यांना विचारणा झाली होती परंतु आरोग्याच्या समस्या मुळे त्या मैदानात उतरल्या नाहीत.

लहानपण व शालेय जीवन सर्व वडील नोकरीस असल्याने भवानीनगर येथील छत्रपती मुलींचे हायस्कूल या ठिकाणी झाले. त्यानंतर बारामती, पुणे, मुंबई ,दिल्ली या ठिकाणी त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण झाले. त्या विमानाच्या इंजिनियर असून एक उद्योजिका म्हणून काम करतात.

शालेय जीवनापासूनच नेहमी वक्तृत्व स्पर्धा मधून ,निबंध स्पर्धांमधून आपले विचार मांडत असत. आजही महाराष्ट्रात युवती महिलांमध्ये स्त्री -काल,आज आणि उद्या या विषयावर जागृती करत असतात.अनेक जयंती सोहळा मधून परखड महिला वक्ता म्हणून पुढे आल्या.त्या स्वतः महिला नियोजित मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात.खो-खो मधील त्या उत्तम खेळाडू होत्या तसेच कराटे, संरक्षणाचे धडे यातून धाडसी प्रवृत्तीच्या बनल्या. संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर,पुणे ,बारामती, पंढरपूर ,मुंबई अश्या अनेक ठिकाणी आंदोलने आयोजित करुन समाजाच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या एक परखड महिला नेतृत्व आहेत. धनगर मेंढपाळ प्रश्न ,ओबीसी जातनिहाय जनगणना ,ओबीसी शिष्यवृत्ती, धनगर आरक्षण , महिला सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांसाठी त्यांनी आंदोलने केलेली आहेत. नुकतेच मुंबई व दिल्ली या ठिकाणी धनगर समाजाला आश्वासने देणाऱ्या व मतांसाठी वापर करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा जाहीर असा निषेध करत आंदोलने गाजवली.

महिला विषयावर जागृती, सुरक्षा, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी , व्यसनमुक्ती ,महागाई तसेच , मेंढपाळ यांचे आरोग्य, रस्ते, शिक्षण यासाठी व आरक्षण आंदोलनातून शासन स्तरावर पाठपुरावा करत असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, संवाद दौरे ,बैठका सतत चालू असतात.  अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये अहिल्यारत्न, समाजरत्न, महिला रत्न, सुपर वुमन तसेच आदर्श पत्रकारिता अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पुरुषांबरोबर महिलांनीही आपल्या बुद्धीचा, क्षमतेचा योग्य वापर करत ,देशहितासाठी विकासाच्या मुद्द्यासाठी पुढे आले पाहिजे हा त्यांचा मानस आहे.
९०% समाजकार्य व १० टक्के राजकारण करीत तळागाळातील वंचित, दुर्बल घटकाला न्याय मिळवून देत विकासाच्या प्रवाहात आणणे, हेच त्यांच्या जीवनातील अंतिम ध्येय आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम