महादरबार न्यूज नेटवर्क -
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा , विधानसभा , जिल्हा परिषद , पंचायत समिती , तसेच इतर सर्व निवडणुका फलटण मधील राज्यकर्त्यांना जिंकायच्या असतील तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक फलटण या ठिकाणी स्मारक बांधण्याची मागणी निवृत्ती खताळ (सर) यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारत देशातील सर्व समाज बांधवांचे असलेले आराध्य दैवत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात त्यांचे कार्य संपुर्ण जाती धर्माच्या उद्धारासाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे. भारत देशातील अनेक मंदिरे त्यांनी बांधली तसेच त्यांचा जीर्णोद्धार केला.
अशा थोर मातेच्या स्मारकाची जागा निश्चित करुन भूमिपूजन जो कोणी फलटण तालुक्यातील नेता आचारसंहितेच्या अगोदर ( ८ मार्च ) महिला दिनाच्या दिवशी जो कोणी करेल त्याच्या पाठीमागे फलटण तालुक्यातील बहुजन समाज तसेच विशेषतः तालुक्यातील सकल धनगर समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा नक्कीच राहील. ते पुढे म्हणाले की ८ मार्च महिला दिनाच्या दिवसा पर्यंत वाट बघितली जाईल.नंतर सकल धनगर समाज फलटण तालुका यांच्या वतीने तसेच बहुजण व धनगर मेळावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. असे धनगर समाजाचे युवा नेते निवृत्ती खताळ (सर) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
0 Comments