Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:सुळेवाडी येथील सारीका सुळे यांची पतीच्या निधनानंतरही प्रचंड संघर्षातून प्रेरणादायी वाटचाल

अहिल्यादेवी होळकर यांच्या  कार्याचा घेतला आदर्श   


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी  हे  छोटेशे गाव पण याठिकाणी  पाणीच नसल्याने लोक मुंबई, वसई भागात काम करुन  कुटुंबाची  उपजिविका करतात.याच गावातील  सारिका सुळे  यांचि     हि अतिशय संघर्षमय एखाद्या  पिक्चर मध्ये जशी स्टोरी असते तशिच मुळच्या महुद गावच्या असणाऱ्या सारीका यांचा २००५ या वर्षी सुळेवाडी येथील  शंकर  कृष्णा सुळे यांच्या बरोबर विवाह झाला. पति वसई याठिकाणी  रिक्षाचालक म्हणून  काम करीत होते  पतीला दारुचे व्यसन होते .२०१७ यावर्षी  पतिचे निधन झाले  .त्यावेळी  त्यांना एक मुलगा  व एक मुलगी होती  पतिचे निधन झाले मुलेही लहान  मग आता  उपजिविका कशी करायचि  हा मोठा प्रश्न  त्यांच्या पुढे होता रिक्षा  दुसऱ्याला चालविण्यासाठी  दिली होती  पण तोही  पैसे देईना म्हणून  पतीच्या निधनानंतर अवघ्या बाराव्या दिवशी  त्यांनी  स्वतः  रिक्षा चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला.  पहाटे पाच वाजता  त्या रिक्षा घेऊन  जात प्रचंड  अडचणीचा सामना  करावा लागला पण दुसरा  कोणताही पर्याय नाही  पाठिमागे दोन लहान मुले त्यांना शाळा शिकवायचि आहे हि जिद्द  यामुळे तिन वर्ष  रिक्षा चालवित कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.यानंतर  २०२० मध्ये  कोरोनाचे संकट यामुळे  लाकडाऊन रिक्षा व्यवसाय थांबला यामुळे  गावाकडे यावे लागले गावाकडे आल्यावर राहण्यासाठी घरच नाही यामुळे  राहणयाचा प्रश्न  स्वतः व दोन मुले घेऊन  दिराकडे पत्राशेड मध्ये  राहु लागल्या  जमिन ७ एकर होते पण पाणीच नसल्याने काय करावे हा प्रश्न  आईवडिलांना  गावाकडे राहणे पसंद नव्हते पण दिर व जाऊ वनिता सुळे यांनी  अडचणीच्या काळात प्रचंड मदत केली. याठिकाणी नंतर सुळेवाडी येथील महिला  टेम्पोने दुसऱ्या  आसपासच्या गावात  खुरपणी  व इतर कामांसाठी  जात असत त्यांच्याबरोबर  कामाला जाऊ लागल्या  शहरात राहिल्यामुळे  शेतातील  काम येत नव्हते पण काम केल्याशिवाय  स्वतःला व मुलांना  जगण्याचा  कोणताही  पर्याय नव्हता  पण सारीका सुळे यांच्या मनात जिद्द होते कि एक ना एक दिवस  याच आपल्या बरोबरच्या महिलांना  बचत किंवा इतर माध्यमातून मि रोजगार मिळवुन देणार. अखेर डिसेंबर  २०२० मध्ये  माणदेशी  फाऊंडेशन  कडे गोट फार्मिंग डॉकटर  म्हणुन  नोकरी  जाईन केलि सध्या  या माध्यमातून दहा - बारा गावामध्ये  काम सुरु आहे. गावातील महिलांना बचत गट काढुन  दिले त्या माध्यमातून  महिलांना  सक्षम केले .पिलीव येथे असणाऱ्या  महिला बचत गटाचे माध्यमातून  महिलांना सक्षम करित सध्या  चेअरमन  म्हणुन  काम करित असल्याचे त्यांनी  आवर्जुन सांगितले  .तर घरची  स्वतःची असणारि  सात एकर शेती  स्वतः  पिकवितात यामध्ये  पाणी देणे किंवा इतर सर्व कामे स्वतः करतात .सध्या  स्वतःचे चांगले घर बांधले आहे  मुलगा अभियांत्रिकीचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे  तर मुलगी  अकरावीत असुन तिचा  डॉकटर होणयाचा मानस आहे. सध्या त्या पिलीव येथे मैत्री बचत गटाच्या  महिला शेतकरी  उत्पादक कंपनीकडे सुध्दा तसेच  हिन्दुस्तान  लिव्हर  कंपनी मध्ये  त्यांच्या  मार्गदर्शनाखाली  १०० ते १५० महिला कार्यरत असुन भविष्यात  अजुन  जास्तीत जास्त महिलांना  रोजगार  उपलब्ध करुन  देण्याचा त्यांचा माणस आहे.

पतीच्या निधनानंतर खचुन न जाता आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना  त्यांनी  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन पदवीचे शिक्षण पुर्ण केले.एवढा मोठा संघर्ष करित संसाराचा गाढा हाकताना त्यांना  सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते  २०१८ हया वर्षी  आदर्श महिला पुरस्कार मिळाला,२०२० हया वर्षि दिल्ली येथे त्यांना गौरविण्यात आले, पुन्हा  २०२३ मध्ये  दिल्ली याठिकाणी  आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,२०२३ ला पुणयशलोक अहील्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच धाडसी महिला म्हणून त्यांना  अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे.    एवढ्या मोठ्या संघर्षानंतर खचुन न जाता जिद्दीने  आपला संसार पुन्हा  एकटिने उभा केला .याविषयी  त्यांनी  माध्यमाशी बोलताना कोणत्याही महिलेने आलेल्या  प्रसंगात खचुन न जाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श समोर ठेवुन  आपले जिवन जगावे असा उपदेश  त्यांनी  समाजातील महिलांना दिला .  

  

Post a Comment

0 Comments