Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun 'कोकणच्या राजाच्या' अस्मितेसाठी आ.शेखर निकम यांनी उठवला आवाज खरा 'हापूस' हा रत्नागिरी-सिंधुदूर्गचाच यावर ठाम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणच्या अस्मितेचा मुद्दा लावून धरला. हापूस आंबा हा केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा अभिमान आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

"हापूस आंबा ही कोकणच्या शेतकऱ्यांच्या घामाची गोड फळे आहेत. मात्र, बाजारात 'हापूस' या नावाखाली इतर भागांतील आंबे विकले जात आहेत. हे अन्यायकारक असून रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या अस्सल हापूसची ओळख टिकवणे आवश्यक आहे," असे त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले.

त्यांच्या या ठाम भूमिकेला मंत्रिमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या विषयावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

आमदार शेखर निकम यांच्या या ठाम भूमिकेमुळे कोकणच्या हापूस आंब्याच्या अस्मितेला नवी ताकद मिळाली आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल आणि जागतिक बाजारपेठेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग हापूस आंब्याची अस्सल ओळख टिकून राहील, असा विश्वास आहे.

Post a Comment

0 Comments