महादरबार न्यूज नेटवर्क - जि.प. प्राथमिक केंद्रशाळा धर्मपुरीचे मुख्याध्यापक व धर्मपुरी केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच शिक्षण क्षेत्रात तेजस्वी प्रकाश पसरवणारे मा.श्री. दत्तात्रय अर्जुन झेंडे सर यांना शिक्षण खात्याचा मानाचा समजला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५ जाहीर झाला असून तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक २९ मार्च रोजी पंचायत समिती सभागृह माळशिरस येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
शालेय ज्ञानमंदिराचा वटवृक्ष समृद्ध करणाऱ्या त्यांच्या अथक परिश्रमांना या पुरस्काराने सुवर्णमुद्रा मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याला घडवणाऱ्या या ज्ञानयज्ञात त्यांच्या योगदानाची ही गौरवशाली पोचपावती ठरली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर पालकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments