Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute सार्थक खंडागळेची जवाहर नवोदयसाठी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत नातेपुते येथील एस.एन.डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल मधील इयत्ता पाचवी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी सार्थक सतीश खंडागळे याची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर जिल्हा सोलापूर  येथे गुणवत्तेनुसार निवड झाली असून त्याला ९७.५० टक्के मार्क्स मिळाले आहेत. त्याला वर्गशिक्षिका सारिका पानसरे व सायना मोल यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन मालोजीराजे देशमुख ,सेक्रेटरी रोहित शेटे यांनी सार्थक खंडाळे या विद्यार्थ्यांचा फेटा शाल हार घालून सन्मान केला व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापक संदीप पानसरे, स्कूल मॅनेजर शकूर पटेल, पी.आर.ओ. मनोज राऊत तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments