#Yavat:यवत येथे सेवा मार्गावरील खड्यांना चक्क तुटक्या फरशांचा आधार
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे सोलापूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्गवर वाहनाची दुचाकी, चारचाकी वाहतूकीची रेलचेल जास्त आहे .पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर यवत हदीत सेवा रस्त्यावर अलंकार बिल्डिंग जवळ भला मोठा खड्डडा पडला आहे या खड्यात नागरिकांना अक्षरशः तुटक्या फारशा व दगड टाकून बुजवावे लागले आहेत पाट्स येथील टोल कम्पनी प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात या खड्डयामुळे दुचाकी स्वरांचे लहान अपघात झाले आहेत. या मार्गावरील खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, टोल प्रशासन वार्षिक जमा खर्चात वर्षाकाठी महामार्ग देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च काय करत आहे असे सामान्य चे मत आहे. महामार्गावरील व सेवा रस्ता दुरुस्ती खर्च योग्य प्रकारे केला जात आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत ची येथील मार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्याची जवाबदारी पाटस टोल प्रशासनाकडे आहे, रस्ता दुरुस्ती करत नाहीत कासुरडी ते यवत पर्यंत लहान मोठे खड्डे झालें तसेच यवत मध्ये सेवा मार्गावर दुरुस्ती झाली नाही दुरुस्तीच्या दर्जाकडे डोळे झाक केली असल्याने वाहन चालक व नागरिकांमध्ये नाराजी सूर उमटले त, प्रशासन मार्गावरील वाहन चालकांकडून टोल वसुली करतांना या सुविधा चा कम्पनी ला विसर पडलेला दिसत आहे, संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांनी महामार्गावर योग्य प्रकारे दुरुस्ती व प्रवाशांना सुविधा देण्यात याव्यत अशी मागणी वाहन चालक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment