#Yavat:यवत येथे माघी गणेशाची तयारी सुरू
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथे माघी गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे.यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यवत येथील ग्राम दैवत असलेल्या गणेश मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी गणेश मूर्तीची पूजा, अभिषेक करून नंतर भजन सेवा होणार आहे. या वर्षी सुद्धा यवत स्टेशन येथे माघी गणेशोत्सव साजरी करण्यात येणार असल्याची माहिती येथील आयोजकांकडून देण्यात आली आहे.
कॅनॉल ग्रुप यवत स्टेशन यांनी या उत्सवाचे आयोजन करण्यात आलेला आहे. सकाळी ६:३० ते ७;३०या वेळेत अभिषेक करण्यात येणार आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे, जुने जाणते लोक सांगतात की मोरगाव येथील मोरया गोस्वामी यांच्याचे नातलग यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मूर्ती खूप जुनी आहे. दगडात कोरलेली मूर्ती आहे .बेंबीत हिरा आहे चांदीचे डोळे आहेत या मंदिराची अशी आख्यायिका आहे.
संध्याकाळी ५ ते ७ या वेळात ह. भ .प .तुषार महाराज दुर्गडे (वरवंड) यांचे किर्तन होणार आहे .महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती यवत स्टेशन (कॅनल ग्रुप) यांनी आलेली आहे.
Comments
Post a Comment