Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुतेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला सुरुवात

पत्रकारांच्या सन्मानाने जयंती उत्सवाला सुरुवात


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते तालुका माळशिरस येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाला दिनांक १ एप्रिल पासून पत्रकारांचा  सन्मान करून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे व सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व पत्रकार यांचे हस्ते महामानवांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य समीर सोरटे व प्रकाश साळवे यांनी बुद्धवंदनेने केली.

यावेळी दैनिक तरुण भारतचे पत्रकार विलास भोसले,प्रमोद शिंदे तसेच किशोर आबा पलंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी पत्रकार बापू बाविस्कर,आनंद जाधव,सुनील ढोबळे,विलास भोसले,प्रमोद शिंदे,समीर सोरटे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मधुकर वनसाळे,आप्पासाहेब सोनवणे, पोपट साळवे,श्रावण सोरटे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे, बादल सोरटे,अभिषेक साळवे,वैभव सोरटे तसेच जयंती समिती खजिनदार युवराज वाघमारे,सचिव अजित पवार,कार्याध्यक्ष विनोद रणदिवे, सतीश जमदाडे, रणजीत कसबे उपस्थित होते.
हा कार्यक्रम विशाल सोरटे,सौरभ साळवे,यश काकडे,अमर सावंत,चंदन सोरटे ,अनिकेत सोरटे यांनी यशस्वी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुद्धभूषण साळवे यांनी तर आभार संघर्ष सोरटे यांनी केले
एक एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत जयंती महोत्सव कार्यक्रम चालणारा असून यादरम्यान पत्रकारांचा सन्मान, भीम गीतांचा कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, संविधान ७५ वा अमृत महोत्सव, निरागस लोककला मंच भारुड, माझा करिअर कट्टा, रक्तदान शिबिर, भीमा तुझ्या जन्मामुळे, जल्लोष भीम गीतांचा, होम मिनिस्टर, महात्मा फुले जयंती अभिवादन सभा, कॅन्सर तपासणी शिबिर, भीम जल्लोष, भव्य मोटरसायकल रॅली, पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण, अभिवादन सभा आधी सामाजिक सांस्कृतिक असे रोज भरगच्च असे कार्यक्रम होणार आहेत.

विशेष म्हणजे नातेपुते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणूक दरवर्षी खूप मोठी निघत असून डॉल्बीमुक्त पारंपारिक वाद्य लावून शिस्तीत आणि  नियोजनबद्ध शांततेत निघत असते.

Post a Comment

0 Comments