Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun राष्ट्रवादी महिला काँग्रेस,खेर्डी आयोजित "होम मिनिस्टर" चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
राष्ट्रवादी काँग्रेस,खेर्डी आयोजित लोकप्रिय आमदार आदरणीय श्री.शेखरजी निकम सर यांचा वाढदिवस व जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ.दिशाताई दाभोळकर मॅडम यांनी आयोजित केलेला "होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा" हा कार्यक्रम महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जल्लोषात व उत्साहात पार पडला.
              
या कार्यक्रमाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय आमदार श्री.शेखरजी निकम सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी त्यांच्यासोबत इतर प्रमुख मान्यवरांमध्ये कार्यक्रमाचे आधारस्तंभ,खेर्डी ग्रामपंचायत चे माजी सरपंच व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष श्री.दशरथ शेठ दाभोळकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण तालुकाध्यक्ष श्री.नितीनजी(अबुशेठ) ठसाळे,महिला प्रदेश उपाध्यक्षा व माजी पंचायत समिती सभापती सौ.पुजाताई निकम मॅडम,महिला जिल्हाध्यक्षा सौ.साधनाताई बोत्रे मॅडम,महिला प्रदेश चिटणीस सौ.रमाताई बेलोसे,जिल्हा उपाध्यक्ष सौ.रविनाताई गुजर,जिल्हा कार्याध्यक्ष सौ.रिहानाताई बिजले,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.नेहाताई जाधव,सौ.निकिताताई सुर्वे,मंडणगड नगरसेविका सौ.प्रियंकाताई लेंडे,सौ.प्रितीताई जैन,तालुकाध्यक्ष सौ.जागृतीताई शिंदे,महिला शहराध्यक्ष सौ.अदितीताई देशपांडे,खेर्डी ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रणालीताई दाभोळकर,माजी नगरसेविका सौ.फैरोजाताई मोडक,कार्यकारिणी सदस्या सौ.मनालीताई जाधव,सौ.पूनमताई भोजने,सौ.सईताई निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
                 
या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उदघाटन चिपळूण पोलीस उपनिरिक्षक शिल्पाताई वेंगुर्लेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी आदरणीय आमदार श्री.शेखरजी निकम सर यांनी महिलांना महिला सशक्तीकरण संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सौ.दिशाताई दाभोळकर मॅडम यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व खेळ प्रसिद्ध हस्यवीर व चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे फेम श्री.वृषभजी अकिवटे यांनी केले तर त्यांना उत्तम साथ प्रसिद्ध शाहीर श्री.शाहीद भाई खेरटकर यांनी दिली.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठलवाडी गणेश मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे,खेर्डी ग्रामपंचायत सदस्य रियाज भाई खेरटकर,ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर,सचिन भोसले,तन्वीर खेरटकर,प्रशांत दाभोळकर,बाळु कदम,दिनेश माटे,ढवण सर,सोहम दाभोळकर,चिन्मय दाभोळकर,साई सावंत,भाऊ देवरुखकर,राकेश प्रजापती,सम्राट भोसले,राहुल पवार यांनी अनमोल सहकार्य व प्रचंड मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments