#Chiplun सावर्डेत महा होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न

८० गावातून ४ हजार महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील आ.   शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त राधा गोविंद फाउंडेशन पुरस्कृत मुक्तांगण आयोजित महा होम मिनिस्टर प्रथम फेरीच्या स्पर्धा दिनांक २९ फेब्रुवारी पासून ते १० मार्च या कलावधीत चिपळूण संगमेश्वर देवरुख या ठिकाणी घेण्यात आल्या.

                           Advertisement 

त्यामध्ये प्रामुख्याने दहा ठिकाणी आपण या स्पर्धा घेतल्या. दसपटी पंचक्रोशी, शिरगाव पंचक्रोशी, खेर्डी, चिपळूण शहर त्याचबरोबर संगमेश्वर, कडवई पंचक्रोशी, देवरूख ग्रामीण, देवरुख शहर, माखजन पंचक्रोशी, सावर्डे पंचक्रोशी, संगमेश्वर शहर या पंचक्रोशीतून बुरंबी, तेरे, असुर्डे, धामणी, ओझर खोत, गोळवली, कसबा, फणसवणे, कुसुंब या गावातील महिलांचा सहभाग होता.
माखजन पंचक्रोशी येथील आंबव, सरंद, मुरडव, आरवली, कोंडीवरे, कासे असावे, नारडुवे, पेढांबे, कळंबूशी, पुरे, नायरी या गावातील महिलांचा समावेश होता. कडवई पंचक्रोशी येथील चिखली, तुरळ, मासरंग, शेणवणे, शिंदे आंबेरी, राजवाडी, शेंबवणे, रांगव येथील महिलांचा सहभाग होता, तसेच देवरुख ग्रामीण येथील निवे, हातीव, हरपुडे, बेलारी, कुंडी, ताम्हणमाळ, अंगवली मारळ, निगुडवाडी, बामणोली, कासार कोळवण, बोंडे या गावातील महिलांचा सहभाग होता. शिरगाव पंचक्रोशी येथील शिरगाव, पोफळी, मुंडे, कुंभार्ली, अलोरे, कोळकेवाडी, खडपोली, पेढांबे येथील महिलांचा सहभाग होता. दसपटी पंचक्रोशी येथील आकले, ओवळी, तिवरे, नांदीवसे, तिवडी, कळकवणे, गाणे या गावातील महिलांचा सहभाग होता. तसेच देवरुख शहर येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत देवरुख शहर, साडवली, पाटगाव येथील महिलांचा सहभाग होता. सावर्डा पंचक्रोशी यामध्ये सावर्डा, कुडप, डेरवण, कोंडमळा, आगवे या गावातील महिलांचा सहभाग होता. खेर्डी पंचक्रोशी, चिपळूण शहर येथे देखील महा मिनिस्टरची फेरी घेण्यात आली, अशा सुमारे १० ठिकाणी आपण महा होम मिनिस्टरची प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रथम फेरीमध्ये ८० गावांचा समावेश होता तसेच ४ हजार महिलांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या प्रथम फेरीमध्ये वेगवेगळ्या खेळांद्वारे स्पर्धा घेण्यात येऊन त्यातील दहा अंतिम स्पर्धकांची निवड करून अंतिम फेरीसाठी सावर्डे येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. दिनांक १० मार्च रोजी सावर्डे येथे हा अंतिम फेरीचा सामना घेण्यात आला. या महा होम मिनिस्टर अंतिम फेरीसाठी प्रमुख उपस्थिती मराठी सिने अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत तसेच चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम उपस्थित होते. त्याचबरोबर विविध कार्यक्षेत्रातील उच्चपदस्थ नागरिक, सर्व गावातील प्रतिष्ठित, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. तसेच मराठी सिने अभिनेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सादरकर्ते अमोल देसाई यांनी उत्साहपूर्ण वातावरणात महिलांकडून विविध खेळांद्वारे पैठणीचा खेळ खेळताना उखाण्यांची संस्कृती जपत जुन्याला नव्याची जोड घालत ही स्पर्धा आयोजित केली. सर्वप्रथम स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांसाठी व स्पर्धकांसाठी विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण अंतर्गत जिजाऊ ब्रिगेड सावर्डे, ज्योती कवितके व ग्रुप आणि मुक्तांगण ग्रुप यांचे तर्फे करण्यात आले. महा होम मिनिस्टर अंतिम फेरीचा सामना हा दहा विविध गावातील महिलांमध्ये खेळला गेला आणि विशेष म्हणजे अगदी ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनी अतिशय उत्कृष्टपणे शहरी भागातील महिलांशी स्पर्धा केली व विशेष म्हणजे प्रत्येक गावातील एक महिला सर्वोत्कृष्ट ठरली. आ. शेखर निकम व सौ पूजा निकम यांनी आपल्या मनोगतांमधून या सामन्याचा निकाल जाहीर करताना तिच्या ग्रामीण भागातील महिलांनी इतका चांगला सहभाग नोंदवला याचे समाधान वाटते. तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्तगुणांना व कौशल्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झाल्या करून दिल्याचे व हे करत असताना त्यांची मिळालेली साथ आणि प्रत्येक गावामधून ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य इतर सर्व अधिकारी गावकरी या लोकांनी केलेले सहकार्य कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यामागचे कारण आहे असे मत व्यक्त केले त्या सर्वांचे आपण कायम ऋणी आहोत अशी भावना व्यक्त केली. हा कार्यक्रम राधा गोविंद फाउंडेशन पुरस्कृत मुक्तांगण्य आयोजित केलेला एक नियोजनबद्ध कार्यक्रम होता व पुढील काळात असेच कार्यक्रम राबवून समाजातील प्रत्येक घटकाला त्यात सामावून घेत प्रत्येकाला योग्य संधी देता यावी या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. व मुक्तांगण ग्रुपच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सन्मान सोहळा पार पडला. प्रथम पैठणीच्या मानकरी सौ धनश्री भुवड सावर्डे (भुवडवाडी) या ठरल्या. तर पुढील दहा क्रमांका साठी असणारे अनुक्रमे द्वितीय क्रमांक सौ.पूर्वा प्रवीण परशुराम -देवरुख शहर (परशुराम वाडी) तृतीय सौ. रिया रमेश कातकर माखजन पंचक्रोशी (कासे मधलीवाडी). चतुर्थ क्रमांक सौ.ज्योती मनोज शिगवण- खेर्डी यांनी मिळवला तर पाचव्या क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी सौ.विनिता विजय धनावडे- कडवई पंचक्रोशी (चिखली). या ठरल्या. सौ. संजना सुनील गावडे- संगमेश्वर शहर यांना सोन्याची नथ देऊन गौरविण्यात आले. चांदीचा छल्ला सौ. श्वेता किशोर कदम- दसपटी पंचक्रोशी (आकले चोरगेवाडी) देण्यात आले. तर मोत्याची चिंचपेटी व मोत्याचा तन्मणी सौ. साक्षी किशोर मोरे- दसपटी पंचक्रोशी (नांदीवसे-राधानगर) व सौ.तनवी अनंत साळुंखे- शिरगाव पंचक्रोशी आणि दहाव्या क्रमांकाचा इमिटेशन ज्वेलरीच्या मानकरी सौ. मयुरी छत्रे सावर्डे (भुवडवाडी) या ठरल्या, अनेक लकी ड्रॉ काढण्यात आले. त्यामध्ये स्पर्धेत सहभागी तसेच उपस्थित सर्वांना वेगवेगळी बक्षिसे देण्यात आली. अंतिम फेरी येथे झालेल्या लकी ड्रॉमध्ये सौ. आरती सावंत, सौ. प्रमिला जोशी नांदगाव, आरती मुळे संगमेश्वर नुरजहान खान सावर्डे यांना बक्षीस मिळाली तसेच बंपर लकी ड्रॉ पैठणी सौ. साक्षी गावणंग तसेच सौ. सीमा गुजर, यांना मिळाली. सदर कार्यक्रमासाठी सावर्डे गावातील सुवर्णकार, श्री लक्ष्मी ज्वेलर्स सावर्डे, विजय ज्वेलर्स सावर्डे, रॉयल ज्वेलर्स सावर्डे, सिया ज्वेलर्स चिपळूण उद्योजक संपदा कलेक्शन सावर्डे, जयंत साडी सेंटर चिपळूण, प्रिया नर्सरी आगवे, प्रतिष्ठित ग्रामस्थ सौ. युगंधरा राजेशिर्के, सुलोचना काजरोळकर, सौ. पूर्वा निकम, सौ. अंजली चोरगे यांचे सहकार्य मिळाले व महा होम मिनिस्टरचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजन व नियोजन याकरिता सहकार्य देवराज गरगटे, वैष्णवी गावडे, सार्थक, विनीत, अभिनव या खरवते कृषी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. मुक्तांगण कमिटीचे सर्व सदस्य सौ. सई निकम सुर्वे, सौ.मीरा जोशी,सौ. प्रिया विचारे,सौ. सरिता कोल्हापूर, सौ.यास्मिन शेख, सौ. वैशाली पाटील, सौ.अरुणा घाडगे, सौ.विद्या कुसुमडे, सौ.अनुष्का काजरोळकर व.पूजा निकम यांच्या संकल्पनेतून झालेला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत