#Chiplun सावर्डे गावातील माऊली चव्हाण आणि सहका-यांनी आमदार शेखर निकम यांना साथ देण्याचा निर्धार; राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्ष प्रवेश

विश्वासाने साथ द्या आत्मविश्वासाने काम करा, आपल्या स्वागतासाठी सदैव तत्पर - आ. शेखर निकम


मतदार संघाचा विकास करण्याची कार्यपद्धती पाहूणच होत आहेत मने परिवर्तन : प्रवेशकर्ते

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण-संगमेश्वर संघातील सावर्डे गाव म्हणजेच आमदार शेखर निकम यांची कर्मभूमी मतदार संघाचा विकास करता करता आपल्या सावर्डे गावाचा विकास अगदी नियोजन पद्धतीने करत केला आहे. शिक्षणाची पंढरी असे संबोधले जाणारे सावर्डे गावाला अशा नियोजबद्ध विकासाची अत्यंत गरत होती आणि ती आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने व आपल्या सततच्या पाठपुराव्याने गेले साडेचार वर्षात प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पक्षविरहीत राजकारण करत व जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत रस्ते, पाणी, क्रिडा, कला, सांस्कृतिक, सहकार व शिक्षण क्षेत्राचा विकास केला आहे.

                            Advertisement 

आमदार शेखर निकम यांची कामाची कार्यपद्धती पाहुण सावर्डे गावातील माऊली चव्हाण आणि सहका-यांनी जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे भेट देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी कार्यालयात "शेखर सर आगे बडो हम तुम्हारे साथ है" एकच जल्लोष झाला. प्रवेशकर्त्यांचा उत्साह पहाताना सरांनी केलेल्या जनसेवेची, विकास कामांची, त्यांच्या कामाच्या पद्धतीची अन त्यांच्यावर लोकांच्या असणा-या प्रेमाची एक वेगळीच प्रचिती सद्या जनतेमध्ये दिसत आहे.

आमदार शेखर निकम यांनी मागील चार वर्षात सर्वच क्षेत्रात तसेच विविध योजनेंर्तगत अल्प कालावधीत रेकॉर्ड ब्रेक निधी मंजूर करुन आणला आहे व नियोजनबद्ध खर्च करुन गावा-गावाचा विकास करत एक आदर्शवत नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. यामुळेच जनतेमध्ये परिवर्तन घडत असून जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)पक्षात प्रवेश करत आहे.

प्रवेश कर्त्यामध्ये सावर्डे गावचे माऊली चव्हाण, राकेश जाधव, दिपक पाठाले, मनोज पवार, योगेश घरशी, सचिन दळवी, सुजित सावंत, देवेंद्र चव्हाण, संजय देसाई, गिरिष चव्हाण, स्वप्निल बावदाणे, महादेव बावदाणे, महादेव बावदाणे, संतोष सावंत, रामचंद्र आकाडे, दिपक बावदाणे, संतोष खरात, गुणाची बावदाणे यांचा समावेश आहे.

आमदार शेखर निकम म्हणाले सावर्डे गाव माझी कर्मभूमी आहे या गावाशी ऋणानुबंध फार जुने आहेत. गावातील विकास कामे करताना गटा-तटाचे राजकारण व पक्ष पाहिलेला नाही. जस ग्रामस्थांनी अडचणी सांगितल्या तस तसे तेथील अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही अडचणी सोडवण्यास व विकास कामे करण्यास कटीबद्ध असेन, फक्त आपली कायमची साथ अन सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास ढळू देवू नका.
या थोडक्याशा काळात कोट्यावधी पेक्षा जास्तीचा निधी आणून नियोजित पद्धतीने मतदार संघाचा विकास करण्याचे धाडस केले आहे. हे सर्व आपल्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यामुळे शक्य झाले आहे. काही कामे झाली नसतील, दुर्लक्षीत राहिली असतील ती आपण पुढील काळात पुर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. माझ्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन आपण सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलात त्याबद्दल तुमचे मन:पुर्वक स्वागत.

यावेळी  सावर्डे गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत