#Baramati चंदुकाका सराफ प्रा. लि. यांचे वतीने विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाटप
महादरबार न्यूज नेटवर्क -
शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बारामतीच्या चंदुकाका सराफ प्रा लि या सुवर्णपेढीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरावागज येथील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले. महात्मा फुलेंनी शिक्षण विषयक धोरणात्मक बदल करून अनिष्ट चालीरीती रूढी प्रथांना बगल देऊन अशिक्षितांना शिक्षित करण्यासाठी दिलेलं योगदान सह्याद्री प्रमाणे मोठे आहे. अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढून त्यांनी भारत वर्षांवर उपकारच केले होते.
अनेक अनाथ बालकाश्रम, व सत्यशोधक समाजाची स्थापना करून लोकांना एकत्रित करून सर्व प्राणीमात्रांना ईश्वराची लेकरे मानून संपूर्ण मानव जातीसाठी कार्य करून साहित्य निर्मिती देखील केली. अशा महामानवांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सुवर्णपिढीने पुढाकार घेऊन सदरील शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करून एक प्रकारे वाचनाची गोडी निर्माण करण्याकरिता केलेला एक विशेष प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी चंदुकाका सराफ प्रा लि चे सेल्स हेड श्री दीपक वाबळे, मार्केटिंग विभाग प्रमुख श्री कुलदीप बावणे, श्री कुमार राठोड यांनी मार्गदर्शन केले. तसेच सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सोने खरेदी ही सुरक्षित गुंतवणूक असून यामध्ये आमच्या सुवर्ण आरंभ व गोल्डन शाईन प्लस या योजनांमध्ये आपण सहभागी होऊन जास्तीचा फायदा मिळवावा असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा लि चे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापिका शेख मॅडम, श्री झंजे सर व सर्व स्टाफ ने चंदुकाका सराफ प्रा लि या सुवर्णपेढीचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे नियोजन धनंजय माने यांनी केले होते.
Comments
Post a Comment