#Indapur कळस येथे अवैध दारू भट्टीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड यांचा छापा
महादरबार न्यूज नेटवर्क -
दि 08/04/2024 रोजी सकाळी श्री विजय रोकडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मौजे कळस गावचे हद्दीत बिरोबा मंदिर चे बाजुला इसम नामे बापु मल्हारी खोमने रा.शेळगांव हा अवैध दारू भट्टी काढत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळालेने त्यांनी तात्काळ जवान श्री केशव वामने यांना दोन पंच बोलविण्यास सांगून स्टाफ व दोन पंच यांना सोबत घेऊन माहिती मिळाले ठिकाणी जाऊन 5.00 वा चे सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी प्रत्येकी 200 लिटर चे 10 कच्चे रसायन चे ब्यालर त्यात एकूण 2000 लिटर कच्चे रसायन त्याची किंमत अंदाजे 70,000/- तसेच तयार हातभट्टी दारू 20 लिटर त्याची किंमत 2000 रु,दारू गाळण्यासाठीचा एक लोखंडी ब्यारेल किंमत 2000 रु, दारू काढण्यासाठी लागणार चाटु व थाळी किंमत 2500 रु, असा एकूण 88100 रु चा मुद्देमाल मिळून आला असून, सदर ठिकाणी मिळून आलेले कच्चे रसायन दोन पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले तसेच तयार हातभट्टी 15 लिटर दारू जप्त करण्यात आली असून सदर दारू भट्टी काढणारा इसम नामे बापु मल्हारी खोमने रा- शेळगांव ता. इंदापूर जी.पुणे हा घटनास्थळावरुन पळवुन गेल्याने याचे विरोधात दारू बंदी अधिनियम कलम 65(ब)(क)(इ)(फ)प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपीस गुन्ह्याचे फरार घोषित करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.अधीक्षक श्री चरणसिंग राजपुत , उप अधीक्षक श्री उत्तम शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दौंड राज्य उत्पादन शुल्क चे निरीक्षक विजय रोकडे, पोलीस उप निरीक्षक सहायक फौजदार दत्ता गवारे जवान केशव वामने, नवनाथ पडवळ, चंद्रकांत इंगळे लोहार यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड विभाग विजय रोकडे करीत आहेत
पोलीस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड
Comments
Post a Comment