#Malshiras पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी हजारो तरुणांची असणार उपस्थिती - शंभूराजे जगताप

भाजप युवा मोर्चाची माळशिरस येथे बैठक संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता माळशिरस या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेसाठी येणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघातील हजारो तरुणांची लक्षणीय उपस्थिती असणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माढा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी माळशिरस या ठिकाणी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


आगामी लोकसभा निवडणूक व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची श्रीनाथ विद्यालय माळशिरस या ठिकाणी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान शंभूराजे जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी माढा लोकसभेचे युवा मोर्चाचे संयोजक अँड.सुजितकुमार थिटे हे उपस्थित होते.


भारतीय जनता पार्टीमध्ये विविध मोठ्या पदांवर असणारे सर्वच नेते हे युवा मोर्चामध्ये काम करून पुढे प्रभावशाली व्यक्तिमत्व झाले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व आगामी लोकसभा निवडणूक ही आपले कार्य दाखवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केले. यावेळी बोलताना माढा लोकसभेचे युवा मोर्चाचे संयोजक सुजितकुमार थिटे यांनी युवा मोर्चाची रणनीती लोकसभा निवडणुकीसाठी कशाप्रकारे असणार आहे. याबाबत कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले.

या बैठकीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा माळशिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने श्रीनाथ विद्यालय माळशिरस या ठिकाणी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत