Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute देवबा सुळवस्ती शाळा आदर्श शिक्षक पुरस्काराने अभिमान लोंढे सन्मानित


महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबा सुळवस्ती  (मोरोची)शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त शाळेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, माजी शिक्षक मेळावा, माजी विद्यार्थी मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून लोंढे वस्ती (कारूंडे )शाळेतील उपशिक्षक श्री अभिमान सोपान लोंढे यांना जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबासूळ वस्ती शाळेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

                        Advertisement 

याप्रसंगी देवबा सूळ वस्ती शाळेचे संस्थापक आदरणीय जालिंदर तात्या, शाळा व्यवस्थापन समितीचे कर्तव्यतत्पर अध्यक्ष आदरणीय श्री . दड्स सर, प्रमुख पाहुणे झेंडे साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण चा सोहळा पार पडला. याचवेळी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ही मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी माजी शिक्षक मिळावा, आणि माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहामध्ये प्रसन्न वातावरणात जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबा सुळवस्ती (मोरोची) येथे साजरा केला या कार्यक्रमास वस्तीवरील तसेच गावातील पालक वर्ग आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments