#Chiplun सरंद येथील गुरववाडी येथे नवीन सभामंडपाचे उद्घाटन पूजा निकम यांच्या हस्ते संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
येथील सरंद गावातील गुरववाडी येथे नविन सभामंडप उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन पूजा शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
  
                           Advertisement     

सरंद गावातील गुरववाडी नेहमीच आपल्या चांगल्या कामांमुळे चर्चेत असते. इथे आजही एकत्र कुटुंब पद्धती दिसून येते. येथील रहिवासी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. कोणताही सण असो, उपक्रम असो की कार्यक्रम असो सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात. यावेळी कामानिमित्त मोठ्या शहरात गेलेले चाकरमानी सुद्धा न चुकता गावी येऊन आनंदात सहभागी होतात.
    
सदर वाडीत राहणाऱ्या रहिवाशांना कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी, सभा आयोजित करण्यासाठी तसेच मुलांना देखील अभ्यासासाठी एखाद्या सभागृहाची आवश्यकता होती. हिच गरज ओळखून सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन आ. शेखर निकम यांच्या सहकार्याने सभामंडप उभारला. शनिवार दि. ३० रोजी चिपळूण पंचायत समितीच्या मा. सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्षा पूजा शेखर निकम यांच्या हस्ते या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी गुरववाडीतील समाज बांधवांची एकत्र कुटुंब पद्धती पाहून त्यादेखील भारावून गेल्या. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीची खूप आवश्यकता आहे. शिवाय एकत्र कुटुंबात एकमत टिकवून ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. गुरववाडीची ही परंपरा पुढील पिढीला एक आदर्श असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे कामी स्त्री महत्त्वाची असते म्हणत त्यांनी येथील महिलांचे कौतुक देखील केले. सदर कार्यक्रमास आ. शेखर निकम यांनी देखील भेट देऊन ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या व सर्वांनी मिळून केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी गुरववाडी ग्रामस्थांतर्फे त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सदर सभामंडपाच्या उद्घाटन प्रसंगी पूजा शेखर निकम यांच्या सोबत रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशिल भायजे, माजी पं.स. सदस्य नाना कांगणे, राष्ट्रवादी काँग्रेस कोकरे जिल्हा गट अध्यक्ष संजय कदम, माखजन गावचे सरपंच मयुर बाष्टे, आंबव गावचे सरपंच शेखर उकार्डे, कळंबुशी गावचे युवा नेते अक्षय चव्हाण, सिध्देश गुरसळे, पांचाळ मॅडम तसेच गुरववाडी तरुण मंडळाचे विलास गुरव, विजय गुरव, रघुनाथ गुरव, दत्ताराम गुरव, प्रकाश गुरव, अमीत गुरव, राजेंद्र गुरव, कुणाल गुरव, संदेश  गुरव, सुबोध गुरव, प्रथम गुरव, सतीश गुरव, सीताराम गुरव, दिपक गुरव, प्रमोद गुरव,  व समस्त गावकरी मंडळी, महिला मंडळ आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत