#Yavat सहजपुर व खामगाव फाटा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू न झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील खामगाव फाटा आणि सहजपुर रेल्वे गेट दरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम केंद्रीय रस्ते विभागाकडून मंजूर आहे. या उड्डाण पुलाच्या मंजुरीस एक वर्षे चा कालावधी झाला असून रेल्वे उड्डाण पुलाचे काम राहिले असल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनधारक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
खामगाव फाटा, सहजपुर दरम्यान रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे गेट असून या दोन्ही गेट दरम्यान वाहनांची सारखी मोठी वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दोन्ही ठिकाणचे उड्डाण पुलाचे काम मंजूर करून घेतले.
दोन्ही पुलाच्या कामाचा संबंधित अधिकाऱ्यांनी पहाणी देखील केली आहे. मात्र दोन्ही ठिकाणच्या उड्डाण पुलांची कामे मंजूर होऊन एक वर्षे उलटून गेली तरी कामे सुरू न झाल्यामुळे वाहनधारक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहनधारक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सहजपुर, नांदूर परिसरात मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. तर दौंड तालुक्यात चार साखर कारखाने, तसेच शेकडोंच्या संख्येनी ऊसाची गु-हाळघरे,इतर व्यवसाय करणारे दोन्ही रेल्वे गेटवरून वाहांनाची वाहतूक होत असते.
पुणे-सोलापूर,अहमदनगर या मार्गासाठी अनेक सुपर फास्ट (जलद) रेल्वे गाड्या व मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे अशा एकशे पन्नास रेल्वेगाड्या जातात. रेल्वे गाड्यांमुळे बऱ्याच वेळा रेल्वे गेट जवळपास अर्धा बंद राहत असल्याने दोन्ही रेल्वे गेटजवळ वाहनांच्या लांब रांगा लागत असल्यामुळे वाहतूक वाढत जाते . वाहनधारक व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो . खामगाव फाटा, सहजपुर दरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम संबंधित प्रशासनाने सुरू अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Comments
Post a Comment