#Chiplun कोसुंब पंचायत समिती गण महायुती लोकसभा निवडणूक सभेला भव्य मेळावाचे स्वरूप

मा. नारायण राणे साहेब यांना महायुतीद्वारे जास्तीत जास्त मताधिक्य  देणारच - आ.शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गटातील कोसुंब पंचायत समिती गणात लोकसभा निवडणूक महायुतीची प्रचार सभा ताम्हाणे येथे पार पडली.


सभेला प्रंचड गर्दी झाली होती सभेचे बघता बघता मेळाव्यात रूपांतर झाले.  सभा चालू होण्याअगोदर पाऊण तास वीज गेली होती. मात्र लोकांची गर्दी कमी न होता वाढतच जात होती. या प्रचार सभेला आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रमोद अधटराव आणि पदाधिकारी मार्गदर्शन करत होते.


महायुतीचे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या या प्रचार सभेत आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना मा. नारायण राणे साहेब यांचा अगदी राजकारण्यात येण्यापासून अगदी मुख्यमंत्री होण्यापर्यंत विकास कामाचा, कोकणातील आणलेली विकास गंगा, कोकणचा विकास या त्यांच्या माध्यमातून कसा झाला, विरोधक संविधान बदलण्याचे करत असलेले आरोप, नारायण राणे साहेब बहुमताने का निवडणूक यावेत, आपण महायुतीद्वारे केलेली विकास कामे तसेच आपण स्वतः आमदार झाल्यावर ना भूतो ना भविष्यात असा भरघोस निधी आणून केलेला चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचा केलेला विकासाचा लेखा जोगा मांडत महायुती लोकसभा उमेदवार नारायण राणे साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ७ मे ला होणाऱ्या निवडणुकीत निशाणी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना बहुमताने विजयी करूया असा निर्धार करा असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तमाम जनतेस आव्हान केले.

या सभेला उपस्थित माजी आमदार नारायण राणे, प्रमोद अधटराव, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा आप आपली मते मांडत तमाम जनतेला मार्गदर्शन करत महायुती लोकसभा उमेदवार नारायण राणे यांना बहुमताने विजयी करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे सांगत जनतेला भावनिक साद घातली.
यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रमोद आधटराव, प्रमोद पवार, रुपेश कदम, सचिन मांगले, संगीता जाधव, देवा भाट्ये, वैभव बने, शैलेश जाधव, पप्पू गोवळकर, विजय किर्वे, बाळ माने, प्रफुल्ल बाईत, निलेश भुरवणे, अमित जाधव, अभिजित सप्रे, प्रतीक जाधव, प्रशांत कांबळे, संतोष बडद, अमित जाधव, मंगेश कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तमाम ग्रामस्थ उवस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत