#Baramati चंदुकाका सराफ प्रा लि यांचे वतीने पर्यावरण दिन वृक्षारोपनाने साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेली बारामतीची सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा लि च्या बारामती व एमआयडीसी शाखांनी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दोनशे वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या या सुवर्णपेढीला फक्त व्यवसाय म्हणून नव्हे तर सामाजिक भान देखील जपण्याची शिस्त या सुवर्णपेढीचे चेअरमन  श्री किशोरकुमार शहा यांनी जपली आहे. वेगवेगळे उपक्रम या सुवर्णपेढीच्या माध्यमातून नेहमीच राबवले जातात.महिलांसाठी अनेक कार्यक्रम देखील या सुवर्णपेढीच्या संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात.
 
ऑक्सिजनची किंमत अनेकांना कितीतरी पटीने कोरोनाच्या काळामध्ये द्यावी लागली. वृक्ष लागवड करून पृथ्वीवरचे तापमान आपण  नियंत्रित करू शकतो,सध्या ती काळाची गरज बनली आहे. हीच गरज लक्षात घेऊन श्री वाघेश्वरी विद्यालय निरावागज व श्री छत्रपती हायस्कूल व जुनियर कॉलेज भवानीनगर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निरावागज येथे अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषद पुणे चे माजी अध्यक्ष श्री संपतराव रंगनाथ देवकाते, एडवोकेट धनंजय देवकाते,शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल चोरमले, अभिजीत चोपडे धनंजय सोलनकर व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच श्री छत्रपती मुलींचे हायस्कूल भवानीनगर येथे संस्थेचे सहसचिव श्री सावंत  व नाडगौडा, शाळेचे मुख्याध्यापक श्री गिरी गोसावी व निंबाळकर एस एस, श्री छत्रपती मुलांचे हायस्कूल भवानीनगरचे  मुख्याध्यापक श्री मचाले  व सेवानिवृत्त शिक्षक श्री अशोक देवकर, सेवानिवृत्त शिक्षक श्री गवळी, श्री डी.जे. निंबाळकर श्री अशोक माने श्री घुले श्री साळुंखे दादासो व विद्यार्थी उपस्थित होते.


तसेच 20 जून पर्यंत  दिव्यरत्न महोत्सव सुरू असून राशी रत्नांच्या खरेदीवर 10 % इतका डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती सेल्स हेड श्री दीपक वाबळे यांनी सांगितले. सदरील उपक्रमासाठी मार्गदर्शन मार्केटिंग विभागाचे हेड श्री कुलदीप बावणे व कुमार राठोड, राहुल घोरपडे व रोहित आवदे यांनी केले. तसेच यावेळी कार्यक्रमाचे नियोजन धनंजय माने, विनोद जगताप,सागर मदने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत