#Shikhar shinganapurगुप्तलिंग येथे वानरांना केले केळांचे वाटप

दादासाहेब हुलगे यांनी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला वाढदिवस


महादरबार न्यूज नेटवर्क -
गूप्तलिंग व शिखर शिंगणापूर येथील वानरांची अन्नपाण्याविना उपासमार ही परस्थिती  लक्षात घेऊन माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब हूलगे यांनी वानरांची अन्नाची गरज भागवली.
       
शिखर शिंगणापूर व गुप्तलिंग परिसरात वानरांचे वास्तव्य अनेक वर्षांचे आहे पण सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरातील फळ झाडांचे प्रमाण घटले आहे त्याचबरोबर पाण्याचे साठेही आटले आहेत त्यामुळे शिखर शिंगणापूर व माळशिरस तालूक्यातील  गुप्तलिंग येथील वानरांचे अन्न आणि पाणी यांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे त्यामुळे वानरांचे पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात स्थलांतर होत ही भीषण दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब हुलगे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुप्तलिंग परिसरातील वानरांना केळांचे वाटप केले .

त्यावेळी निलेश हुलगे,जगन्नाथ हुलगे,नवनाथ हुलगे,रणजित गोरड आदी जण उपस्थित होते.हा सामाजिक उपक्रम जरी छोटा असला तरी त्यामागील उद्देश समाजातील दानशूर व्यक्ती व पर्यावरणप्रेमींनी पुढे येऊन वानरांना फळांची व पाण्याची सोय करावी हा आहे.जेणेकरून हे वन्यजीव वाचण्यास मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत