#Pune वनाझ परिवार विदया मंदिर शाळेचा ४६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड येथील सदैव उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असलेल्या वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड पुणे या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी शाळेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी शाळेचा ४६ वा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती रजनी दाते, शिक्षण सल्लागार अ. ल. देशमुख, सचिव वाय. के. कदम, खजिनदार विनोद सपकाळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिताताई दारवटकर व उपमुख्याध्यापिका निताताई जाधव पर्यवेक्षिका सौ माया झावरे, सौ.कांचन गोपाळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व शाळेचे संस्थापक खांडेकर सरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली वर्धापन दिनाचा कार्यक्रम दोन्ही विभागांमध्ये अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त शाळेत विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.
यावेळी प्राथमिक विभागामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कांबळे तर उच्च प्राथमिक विभागामध्ये स्वाती वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे शैक्षणिक सल्लागार अ. ल.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी शाळेविषयी असणारे आपले प्रेम मनोगतातून व्यक्त केले तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांनी सुद्धा खूपच सुंदर मनोगते व्यक्त केली तर लहान मुलांनी गाणी व कविता सादर केल्या शाळेतील शिक्षिका सरोज सणस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. बेनिझर पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . शाळेतील सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते वर्धापन दिनाचे औचित्य साधत शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता दारवटकर यांनी विद्यार्थ्यांना शाळा प्रगत करण्याचा संकल्प करणे विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचे आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले शेवटी कार्यक्रम सांगता शांती मंत्राने करण्यात आली व वर्धापन दिन संपन्न झाला.
Comments
Post a Comment