#Malshiras माळशिरस येथे स्वाभिमानीचे आक्रमक आंदोलन

मका,तेल, दूध भुकटीबाबत केंद्राने काढलेले अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी


महादरबार न्यूज नेटवर्क -
केंद्र सरकारने १० हजार टन दुध भुकटी ५ लाख टन मका 3 लाख कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयतीचा अध्यादेश काढला या निर्णयाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या अध्यादेशाची माळशिरस येथे रविवारी होळी करण्यात आली.

केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका,कच्चे सूर्यफूल रिफाइंड मोहरी तेल,आणि दूध भुकटीची आयात शुल्क शून्य केले आणि १० हजार टन दूध भुकटी ५ लाख टन मका ३ लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला या अन्यायकारक अध्यादेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अजित बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली या  निर्णयाच्या थेट परिणाम दूध मका आणि तेलबियांच्या दरावर होणार आहे. दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयतीमुळे भुकटीचे भाव कमी झाले.
या निर्णयामुळे दूध दरात ही तीन ते चार रुपये पर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संघटनेचे सचिन शेंडगे, तुकाराम काळे, सुदाम शेंडगे, दादासाहेब काळे, तसेच उमेश भाकरे तात्यासाहेब काळे यासह शेतकरी उपस्थित होते..


केंद्र सरकारने शेतकरी विरोधी  निर्णय घेतला आहे त्यामुळे केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल
अजित बोरकर
स्वाभिमानी शेतकरी संघटना

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत