#Yavat बाल शास्त्रज्ञ आर्यन राऊत याने बनवली घरी ई- सायकल


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील लहानश्या १३ वर्षाच्या  आर्यन विजय राऊत (केडगाव)  याने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये टाकाऊ वस्तु पासून घरच्या घरी इलेक्ट्रिक सायकल बनवली.२० ते २५ किमी एकाच वेळी चार्जिंग केल्यानंतर  सायकल जाते. शालेय विद्यार्थ्यांसाठी या बाईकचा उपयोग होऊ शकतो असे  आर्यनने  सांगितले.

आर्यनचे वडील कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये अभियंता आहेत. तर आजोबा शेतकरी आहेत. आर्यनने ई-सायकल बनवण्याची संकल्पना आपले आजोबा विठोबा राऊत यांच्याकडे मांडली. आजोबांनी त्यास संमती देत त्याला लागणाऱ्या वस्तू पुरवल्या. आजोबा व नातवाचे घरच्या घरीच प्रयोग सुरू झाले. सर्वप्रथम त्याने घरी बंद अवस्थेत असलेली जुनी सायकल घेतली. तिला सूस्थितीत चालू केली. त्यानंतर लॅपटॉपच्या जुन्या बॅटरीतील सेल वापरून त्याला चार्जेबल करण्याच्या विचारात होता. मात्र वडिलांनी यूपीएस मधून शिल्लक राहणाऱ्या दोन बॅटऱ्या त्याला प्रयोग करण्यासाठी दिल्या. त्या सायकलचे कंट्रोलर व मोटर व्यवस्थित ठेवण्यासाठी एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये त्याला ठेवायला सांगितले. सायकलच्या बरोबर मध्यभागी बॉक्स बॅलन्ससाठी ठेवले.  गिरमिटच्या मदतीने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिट केल्या. वायरिंग व्यवस्थित करून प्रयोगांना सुरुवात केली. आर्यनला किती बल ओढायचे असल्यास त्यास किती होल्ट बॅटरी लागेल. त्याला त्या बॅटरीचे एंपियर, हॉर्स पॉवर या सर्व कन्सेप्ट माहित आहेत. बॅटरी पॅरलल व सिरीयल कशी जोडायची या गोष्टी सुद्धा त्याला माहिती आहेत. एलईडी बल्ब व लॅपटॉपच्या बॅटरी मधील सेल काढून आर्यनने आपले आजोबा विठोबा राऊत यांना एक बॅटरी बनवून दिली आहे. आजोबा येथे याचे कौतुक सर्वांना दाखवत असतात.

दौंड तालुक्यातील वाखारी  येथील रँचो गुरुकुल शाळेत सध्या इयत्ता ७  शिक्षण घेत आहे. संस्थेचे प्रमुख हर्षद शहा यांनी विविध शैक्षणिक वैज्ञानिक शाळांना विद्यार्थ्यांसह भेटी दिल्या आहेत. संस्थेच्या सचिव स्वाती देशमुख प्राचार्य मोहिनी गायकवाड यांनी देखील वेळोवेळी लहानशा आर्यनला वेगळ्या पद्धतीने छोटा वैज्ञानिक साठी मदत केली आहे. त्यातून आर्यनच्या वैज्ञानिक  क्षेत्रात पाहण्याची आवड तयार  झाली  असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. परिसरातून आर्यनच्या या ई- सायकलची चर्चा होतेय.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम