#Indapur आजच्या राज्यकर्त्यांनी अहिल्यादेवींच्या विचारांचा आदर्श घ्यावा - कल्याणी वाघमोडे

जयंतीच्या माध्यमातून सामाजिक चळवळ जागृत राहिली पाहिजे, कल्याणी वाघमोडे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी - विशाल बी.के कोकरे


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भवानीनगर येथे जयंती उत्सव उत्स्फूर्तपणे संपन्न.


महादरबार न्यूज नेटवर्क -
अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती साखर कारखाना भवानीनगर येथील मैदानावर विविध क्षेत्रातील महिलांसह मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष व २९९ वी जयंती उत्सव चे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले होते.


सर्व महापुरुषांचे स्मारक अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार नंतर मनोगते व्यक्त केली. प्रस्ताविक करताना कल्याणी वाघमोडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून असे उत्सव साजरी करणे गरजेचे आहे. यावेळी आज पर्यंत राजकीय पक्ष यांनी फक्त मतांसाठी अहिल्यादेवी च्या नावाचा व धनगर - ओबीसी समाजाचा वापर केला आहे,ही खंत व्यक्त केली. हा सामाजिक कार्याचा विचार अखंडपणे चालू राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.अठराव्या शतकातील उत्तम प्रशासक असणाऱ्या,२८ वर्षे राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले.
गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी अहिल्या रत्न पुरस्काराने स्वर्गीय बी.के.कोकरे यांचे सुपुत्र विशाल कोकरे यांना गौरवण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी चळवळीचे महत्त्व व स्वर्गीय बी.के कोकरेंचा लढा याबाबत वाच्यता केली. चळवळ नेहमी जागृत राहिली पाहिजे आणि ती चालवण्याचे काम वाघमोडे कुटुंब करते आहे हे पाहून आनंद व्यक्त केला. मेंढपाळ समाजाने देखील शिक्षण घेत जागृत असले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.


तसेच यावेळी समाजरत्न पुरस्कार म्हणून धनगर आरक्षण उपोषण कर्ते चंद्रकांत वाघमोडे, लेखिका व कवयित्री स्वाती तोंडे, निरगुडे ग्रा.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या साधना केकाण,सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा मुलाणी, स्व. शंकरराव नारायण सोट पाटील संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील , दलित पॅंथर चे हर्षल वाघमारे, ज्येष्ठ समाजसेविका मंजुळाताई रुपनवर, लोकशाही न्यूज व मानवाधिकार फाउंडेशनचे धनराज जगताप, तलाठी परीक्षा उत्तीर्ण झालेले सचिन वाघमोडे आणि उल्लेखनीय म्हणून आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली कुस्तीपटू रोहिणी देवबा, महाराष्ट्र केसरी पै. अमृता पुजारी यांना गौरवण्यात आले.
दहावी तील  ९२ टक्के मार्क्स मिळवलेली शुभांगी खरात, संस्कृती रुपनवर (८४ %), कल्याणी बंडगर ( ९०%), बारावीतील वैभवी देवकाते ( ८५ %), सिद्धी पांढरे (८५%) आदी विद्यार्थ्यांना सत्कार करुन गौरविण्यात आले.
तसेच माळशिरस व दौंड तालुक्यातील गझी ढोल नृत्य स्पर्धा विशेष होती.
  
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राहुल भाऊ झारगड, दत्तात्रेय भाऊ पुणेकर, ढेकळवाडी चे माजी सरपंच नानासो घुले,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अण्णा देवकते, जय हिंद सेनेचे सनी पाटील, योद्धा प्रोडक्शन चे योगेश नालंदे,प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुकशाला ढाणे, शालन पांढरे, अविनाश भिसे,अजितभाऊ घुले ,भूषण टकले, सचिन गडदे, वामन भिसे सर , नाना सोलनकर, संकेत देवकाते , निखिल पाटील, धनसिंग पाटील आदी सह युवा मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.  महिलांच्या मनोरंजन कार्यक्रमात विजेत्या स्वरांजली पांढरे यांनी पैठणी जिंकली. आभार व मनोगत डॉ.सुजित वाघमोडे यांनी मानले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बुरुंगले व विलास दोलतडे यांनी केले छायाचित्रण प्रशांत कुचेकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम