#Pune औंध गाव येथील श्री शिवाजी विद्यामंदिर येथे ४४ वर्षा नंतर इयत्ता १० वी सन १९७९-८० बॅच माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
जनता शिक्षण संस्थेच्या औंधगाव येथील श्री शिवाजी विद्यामंदिर औंध गाव पुणे येथे ४४ वर्षा नंतर  इयत्ता १०वी सन १९७९-८० बॅच माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा वार रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाला.
     
सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी  कल्पना गायकवाड सदाकाळ,सुधीर बोर्डे ,अभिमान काळे,सतीश रानवडे व अँड पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील यांनी प्रयन्त केले. श्री शिवाजी विद्यामंदिर,औंधगाव पुणे  येथील शाळेत प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर राधिका हॉटेल मध्ये गुरुजनांचे स्वागत करून सरस्वती पूजन करण्यात आले. गायत्री मंत्र व गुरुवंदना सुनीता रानवडे काळे व संध्या योहान काळे यांनी केली.
सदर कार्यक्रमास गुरुजन श्री प्रभाकर पोकळे,श्री चंद्रकांत घम,श्री ताकवले,श्री विलास किर्दक,विद्यमान प्राचार्य श्री काळे व सौ भारती मुळे बुचके उपस्थित होते.
 
गुरुजनांचा सत्कार ट्रॉफी,भेटवस्तू व श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी यांना अँड पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील यांच्यातर्फे  शालेय जीवनाची आठवण म्हणून माजी शालेय विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

गुरुजन व विद्यार्थी यांनी  त्यांचे मनोगत व्यक्त करून शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला.
सदर कार्यक्रमाची सांगता करताना विक्रम केतकर यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम