#Yavat नांदूर,सहजपूर गावातील युवकाचे अर्धनग्न आंदोलन
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील नांदूर - सहजपुर भागातील विविध कंपन्यांकडून स्थानिक नागरिकांवर कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी सातत्याने अन्याय होत आहे. या विरोधात गावच्या काही प्रमुख मागण्या घेऊन योगेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, सोमनाथ बोराटे, राजेश पारवे हे युवक दि.१ जुलै पासून नांदूर येथील फिल्डगार्ड कंपनी समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून या आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तसेच कंपनी प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणाकडे न फिरकल्याने कंपन्याच्या कारभारा बद्दल जनतेत रोष निर्माण झाल्यामुळे व दोन उपोषण कर्त्यांनी प्रकृती डासाळल्यामुळे नांदूर आणि सहजपुर गावातील युवकांनी उपोषणस्थळी जाऊन आज शनिवारी अर्धनग्न आंदोलन केले.
यामध्ये फ्लिट-गार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड,फेनस ऑटो लिमिटेड, पुष्पम फुड्स प्रायव्हेट लिमिटेड, वैष्णवी देवी दूध कंपनी, प्रामुख्याने या कंपन्यातून होणाऱ्या जल प्रदूषण वायू प्रदूषण आणि कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहेत. तसेच किमान वेतन कायदा आणि गौण खनिज उत्खनन या नियमांना फाट्यावर मारण्याचे काम या कंपन्यांकडून होत असून या बाबतीतले पुरावे स्थानिकांकडे आहेत तरीही कंपनी प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणाकडे न फिरकल्याने कंपन्याच्या मुजोर कारभारा विषयी जनतेत रोष निर्माण झाल्यामुळे नांदूर, सहजपुर येथील युवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले.
उपोषणस्थळी भेट दिली असून उपोषण कर्त्यांच्या स्थानिकांना कंपन्यांनी कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्याची तसेच जल प्रदूषण वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे. जल प्रदूषण वायू प्रदूषण विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून स्थानिकांना कामावर कायमस्वरूपी सामावून घेण्याचा अधिकार कामगार विभागाशी निगडीत आहे. सुरू असलेले उपोषण थांबवण्यासाठी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (अरुण शेलार, तहसीलदार दौंड)
Comments
Post a Comment