महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळुण येथील आ. शेखर निकम मित्र मंडळ चिपळूण आयोजित दहीहंडी उत्सव मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी चिपळूण शहरातील शिवाजी चौक, अजिंक्य आर्केट- चिंच नाका येथे मोकळ्या जागेत, आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायं.५ वाजल्यापासून विविध भागातून गोविंदा पथकांचे चिपळूण शहरांमध्ये आगमन झाले व मंडळाच्या वतीने सर्व गोविंदा पथकाची नाव नोंदणी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपासून शेखर निकम व सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते व महिला भगिनी तसेच आमदार शेखर सर मित्र मंडळ यांचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात तरुणाईंच्या उत्साहात गोविंदा उत्सव साजरा करण्यात आला.
विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या चिपळूणातील नागरिकांचे, महिलांचे, तरुण विद्यार्थ्यांचे आमदार शेखर सर यांच्या हस्ते सर्वांना सन्मानपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच येणारा सर्व गोविंदा पथकांना दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला व रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन त्यांना उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी-मिलिंद कापडी, मनोज जाधव, सचिन पाटेकर, समीर काझी, योगेश शिर्के, अल्हाद यादव, सचिन साडविलकर, अनिकेत ओतारी, विश्वनाथ कांबळे, वरूण(दादू)गुडेकर, मिनेश कापडी, विनायक पाटेकर, तुषार गमरे, प्रथमेश डाकवे, समीर जानवलकर, खालिद दाभोळकर, इम्रान कोंडकरी, अमीन परकार, बरकत पाते, इम्रान खतीब, जहीर कुंडलिक, सुयोग(बंड्या)चौधरी, कपिल महापुस्कर, कैसर देसाई यांनी विशेष मेहनत घेतली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सखी थरवळ यांनी केले.
0 Comments