#Yavat खडकवासला – फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
आमदार राहुल कुल यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे - खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालवा कि. मी. १ ते ३४ साठी २७ किमी पर्यायी खडकवासला – फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सुमारे २१९०.४७ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार, ३ टीएमसी पाण्याची बचत, दौंड, हवेली, इंदापूर व बारामती तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार 

खडकवासला प्रकल्पाच्या नविन मुठा उजवा कालव्याचा कि. मी. १ ते ३४ लांबीचा भाग पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जात असल्याने पुणे शहराची सर्वांगिण बाजूने होणारी वाढ, झोपडपट्टी, अतिक्रमणे व पर्यायाने होणारे जलप्रदुषण, जलनाश यामुळे कालव्याची होत असलेली हानी व त्यामुळे कालव्याच्या वहनक्षमतेत झालेली घट टाळण्यासाठी नविन मुठा उजवा कालव्याच्या कि. मी. १ ते ३४ मधील लांबीसाठी २७ किमी पर्यायी खडकवासला ते फुरसुंगी पर्यंत बोगदा करावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच विधानसभा सभागृहात देखील वेळोवेळी प्रश्न, लक्षवेधी चर्चा, अर्धातास चर्चा अशा आयुधाच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केली होती. याबाबत शासनस्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या तसेच दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसयांनी दिले होते. आमदार कुल यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, या प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.

या पर्यायी खडकवासला - फुरसुंगी बोगदा प्रकल्पामुळे सुमारे ३ टि.एम.सी. पाणी बचत होऊन दौंड, हवेली, इंदापूर व बारामती तालुक्यातील सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून सिंचनापासून वंचित राहणारे ३४७१ हे. इतके क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला प्रकल्पाअंतर्गतच्या नविन मुठा उजवा कालव्याचा कि. मी. १ ते ३४ ऐवजी खडकवासला - फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन २०२२ - २३ च्या दरसूचीवर आधारित रू. २१९०.४७ कोटी इतक्या किंमतीच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

तसेच जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) कि. मी. ४३ (कुंजीरवाडी - लोणीकाळभोर, ता. हवेली) ते कि. मी. १०९ (भागवतवस्ती पाटस, ता. दौंड) एकूण ६७ कि. मी. लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी सुमारे १८८.७५ कोटी रुपयांच्या निधीस देखील  उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस मंजुरी दिली असून त्याची निविदा प्रकिया देखील पूर्ण झाली आहे. लवकरच कामाला देखील सुरुवात होणार आहे.

दौंड तालुक्यातील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरित करणे व अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची (SLTAC) ची मान्यता घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया करावी आशा सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असून त्याला देखील लवकरच मान्यता मिळेल असे आमदार कुल यांनी सांगितले तसेच मुळशीचे पाणी पूर्वमुखी वळविण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या सुर्वे समितीचा अहवाल स्वीकारण्याबाबत देखील राज्यसरकार सकारत्मक असून, याबाबत देखील चांगला निर्णय महायुती सरकार घेईल असे देखील आमदार राहुल कुल यांनी यावेळी सांगितले आहे.

या सर्व निर्णयाबाबत आमदार राहुल कुल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तसेच यासाठी प्रशासकीय पातळीवर काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम