महादरबार न्यूज नेटवर्क - जिल्हा परिषद पाटीलवस्ती शाळा(मा.) ६०फाटा, ता.माळशिरस शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपली असल्यामुळे नवीन शाळा व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन दिनांक-१२/०८/२०२४, वार- सोमवार रोजी करण्यात आले. यावेळी उपस्थित पालकांमधून सर्वानुमते पत्रकार सौ.शोभाताई ता. वाघमोडे यांची अध्यक्ष व शिवाजी वाघमोडे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सर्व प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांचा सत्कार,शाळेतील मुख्याध्यापिका सौ. गोरे मॅडम यांची बदली कन्यामाळशिरस येथे झाल्याने त्यांचा निरोप समारंभ व सत्कार तसेच मंथन परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना सौ. गोरे मॅडम यांनी त्यांचे अनुभव सांगितले.ग्रामस्थ,पालक,शिक्षक यांचे सहकार्य त्यांना लाभले व येथील सेवाकाळ निश्चित स्मरणात राहील असे त्यांनी आवर्जून सांगितले.त्यांच्या सेवाकाळात पाटीलवस्ती शाळेस आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला असून शाळेचे नावलौकिक झाले आहे.
याप्रसंगी शिक्षण प्रेमी राजाभाऊ वाघमोडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पाटीलवस्ती शाळेतील शिक्षिका सौ. गायकवाड मॅडम, श्री. निकम सर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
0 Comments