#Yavat/Dharashiv ग्राम रोजगार सेवकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार- योगेश केदार, शिवसेना प्रवक्ते
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
जवळपास दीडशे गावातील ग्राम रोजगार सेवक यांच्या सोबत धाराशिव शिंगोली शासकीय विश्रामधाम येथे बैठक पार पडली पार पडली. ग्राम रोजगार सेवक हे शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात. परंतु त्याचा योग्य मोबदला ग्राम रोजगार सेवकांना मिळत नाही. त्यांना शासनाने नियमित वेतन द्यावे अशी मागणी आहे. इतर राज्यात या सेवकांना मोठ्या प्रमाणात लाभ करून दिला जातो. महाराष्ट्र हे रोजगार हमी कायदा अंमलात आननारे पाहिले राज्य आहे. नंतर हाच कायदा केंद्र सरकार ने नावात बदल करून अंमलात आणला. पण याच राज्यात रोजगार हमी कायदा अमलात आणण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सेवकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब च आमचे प्रश्न मार्गी लावतील अशी आशा आम्हाला आहे असे रोगर सेवकांचे म्हणणे होते.
ग्राम रोजगार सेवक या पदाला ग्राम रोजगार सहायक असे पदनाम करून शासनाने ग्राम विकास मंत्रालय सोबत जोडावे अशीही मागणी आहे. त्याबाबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सचिवांना आदेशही दिले आहेत. परंतु सचिवांनी अजून अंमलबजावणी केली नाही. असे रोजगार सेवकांनी सांगितले. त्याबाबत योग्य तो पाठपुरावा करून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून लवकरात लवकर मार्गी लावण्याचा शब्द शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी दिला.
यापूर्वी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांना रोजगार सेवकांच्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. सचिव स्तरावर त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हे ग्राम रोजगार सेवकांना माहिती आहे.
Comments
Post a Comment