#Malshiras राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस विधानसभा निवडणूक लढवणार - रणजीत सूळ
महादरबार न्यूज नेटवर्क -
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार माळशिरस विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष , विधानसभा निवडणूक निरीक्षक रणजीत सूळ यांनी सांगितले. निरीक्षक रणजीत सूळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासाठीची आढावा बैठक माळशिरस येथे पार पडली.
यावेळी बोलताना रणजीत सूळ म्हणाले की
लवकरच या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा घेण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर लवकरच माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले सर्व समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे .
आरक्षणामुळे बिघडलेला सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी, कायमचा तोडगा काढण्यासाठी आरक्षणाचे ५०% चे सिलिंग हटवले पाहिजे.
वाढलेली बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच शेतकऱ्याला शेतीपूरक उद्योग करण्यासाठी धोरण तयार केले पाहिजे यासाठी अर्थ पुरवठा करणाऱ्या बँकांना बँक गॅरंटी सरकारने दिली पाहिजे.
महिलांवर /मुलींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात कठोर कायदे तयार केले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाने एस.टी.च्या आरक्षण संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत . त्यानुसार धनगर समाजाच्या एस. टी. च्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे.
सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे.
सर्वांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्या पाहिजेत.
घरकुलांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग असा फरक न करता पाच लाख रुपये अनुदान दिले पाहिजे.
या मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्ष सामोरे जाणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापन दिन सोहळा अकोला येथे २९ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा होत आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमातूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
यावेळी जिल्हा प्रवक्ते संजय वलेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, जिल्हा सचिव वैजनाथ पालवे, तालुकाध्यक्ष आबा मिटकरी, युवा तालुका अध्यक्ष रविराज शेंडगे, महिला आघाडीचे नेत्या कविता ताई माने, तालुका उपाध्यक्ष अतुल पाटील, रणजीत झंजे, ब्रह्मदेव बर्वे, विधानसभा संघटक जयवंत सरक, नातेपुते शहराध्यक्ष अमरजीत जानकर तसेच माळशिरस विधानसभेतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment