महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेतील चिमुरडयावर जो अमानुष अत्याचार केला ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे. याच्या निषेधार्थ सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात पिलीव येथे सर्वपक्षीय कैन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.
याची सुरुवात पिलीव येथील हनुमान मंदीरापासुन झाली तर शेवट पिलीव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आला. यावेळी पक्षीय मतभेद विसरून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यामध्ये मनसेच्या नगरसेवक रेश्माताई टेळे,मनसेचे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे,तालुका संघटक मायाप्पा जावळे, अनंता जामदार, शिवसेना तालुका उपाध्यक्ष डॉ निलेश कांबळे, आरिफखान पठाण, शयामतात्या मदने, नितीन कपने,अविनाश जेऊरकर, फिरोज शेख,अतुल जामदार, माजी सरपंच अमोल मदने, मोहसीन शेख,रणधीर जामदार, राजाभाऊ जामदार, अमिनखान पठाण,सचिन पुकळे, कदीरखान पठाण, रहीम शेख,सागर भैस,मंगेश वाघमारे, वैभव पिसे,पुनम भैस,सुषमा जामदार, काजल रजपुत, जहागिरदार ताई,कविता देशमुख, रिझवाना शेख, ज्येष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे, प्रमोद भैस,संजय पाटील, यांच्यासह असंख्य महीला,मुली,मुले,नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या घटनेतील आरोपीला ताबडतोब फाशीची शिक्षा देणयात यावी अशी निवेदनादवारे मागणी करणयात आली. यावेळी पिलीव पोलीस स्टेशनचे हवालदार अमीत जाधव व सतिश धुमाळ यांनी सदरचे निवेदन स्विकारले. निवेदन दिल्यानंतर सदरचा कैन्डल मार्च समाप्त करण्यात आला.
0 Comments