Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासठी कट्टीबद्द - शिक्षक आमदार जयंत आसगावकर


महादरबार न्यूज नेटवर्क -
शिक्षण क्षेत्रात अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शालार्थ आयडी टप्पा अनुदान निवड श्रेणी जुनी पेन्शन असे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. शिक्षक कर्मचारी बांधवांमध्ये मोठा असंतोष आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी अथक प्रयत्न करीत आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले. चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व जुनिअर कॉलेज नातेपुते येथे सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते.


महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कौन्सिल सदस्य व चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य रविंद्र चांगण यांनी अभ्यासपूर्ण रीतीने शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची मांडणी केली. याप्रसंगी आमदार जयंत आसगावकर व सौ. आसगावकर वहिनी यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सुखदेव वलेकर यांनी समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी सुनील गोरे पांडुरंग कुचेकर प्रशांत कथले गोरखनाथ शेंडे शिवाजी लवटे शिवाजी पांढरे रवींद्र पोतदार प्रदीप राऊत भीमराव तुमराम सुभाष गोरे किरण सोरटे कैलास गवळी स्मिता आवळे अलका दीक्षित हेमा ढवळे विशाखा केंगार छाया वाघमोडे सिकंदर मुजावर संतोष कुंभार अभिजीत वाळके अरुण आदलिंगे राहुल डगळे अनिल घेमाड या तालुक्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक चर्चेमध्ये विचारविनिमयामध्ये सहभाग घेतला. सिकंदर मुजावर यांना पी. एच डी मिळाल्याबद्दल त्यांचा आमदार साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments