Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun काटवली ढोसळवाडी ग्रामस्थांचा आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात (अजितदादा गट) पक्ष प्रवेश

अनेक पक्षातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते (अजितदादा गट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अनेक राजकीय पक्षाला खिंडार पडत असून काटवली ढोसळवाडी ग्रामस्थांनी आज आमदार शेखर निकम यांच्या राष्ट्रवादी पक्षात (अजितदादा गट) प्रवेश केला.
संगमेश्वर तालुक्यात राजकीय वारे वाहू लागले असून, मुचरी पंचायत समिती गणातील काटवली ढोसळवाडी ग्रामस्थांनी आणि माजी उपसरपंच बाळकृष्ण उबारे व मुंबई अध्यक्ष पांडुरंग मांडवकर यांनी राष्ट्रवादी पक्षात (अजितदादा गट) आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करण्यासाठी जे जे करावे लागेल ते प्रामाणिक पणे करण्याचे काम राष्ट्रवादी  पक्षाचा नेता म्हणून मी करणार असल्याचा शब्द यावेळी कार्यकत्यांना दिला आहे. अनेक लोक दारावर येऊन थांबले आहेत. तसेच इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी पार्टीत येण्याच्या मार्गांवर असून लवकरच मोठा राजकीय भूकंप चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात होणार आहे. मतदार संघात आमदारांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहू लागली असून त्यांचे काम पाहून तसेच काटवली ठेसाळवाडी  येथील अत्यंत गरजेचा असणारा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवल्याने आज काटवली ढोसळवाडी  ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा गटात) प्रवेश केला आहेत.


कार्यकत्यामध्ये जयराम घवाळी, आत्माराम कळंबटे, गोविंद मांडवकर, अर्जुन कळंबटे, चंद्रकांत उबारे, सुनिल उबारे, एकनाथ उबारे, संतोष उबारे, संदिप कळंबटे, गंगाराम घवाळी, संजय कळंबटे, मंगेश मांडवकर, भागोजी कळंबटे, शिवराम गेल्ये, काशिराम मांडवकर, अनंत कळंबटे, अमित घवाळी, सुरज घवाळी, योगेश कळंबटे, दिपक जुवळे, सलोनी घवाळी, सुलभा उबारे, अरपित उबारे, अपुर्णा उबारे, सुनिल कळंबटे, शशिकला उबारे, अनिता उबारे, वनिता कळंबटे, प्रतिभा घवाळी, अपुर्णा मांडवकर, अनिता मांडवकर यांनी समावेश केला.


यावेळी माजी पंचायत समिती सभापती पूजा निकम, सई निकम, महिला तालुका अध्यक्षा मानसी करंबेळे, संकेत खामकर, अनिल नांदळजकर, महेश नांदळजकर, सुधिर भोसले, मयुर खेतले, बाबुशेठ साळवी, गणपत चव्हाण, सुशिल भायजे, मंगेश बांडागळे, रामू पंदेरे, बाळा पंदेरे, नितीन भोसले, बाळा पंदेरे, तुकाराम मेस्त्री आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments