#Chiplun जीवाची पर्वा न करता जनतेसाठी झगडणारा आपला माणूस म्हणजे शेखर सर


महादरबार न्यूज नेटवर्क -
जुलै 2021 च्या  प्रलयकारी पुरानंतर  चिपळूण शहर व परिसरातील  गावांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिक हताश  झाले. परंतु ह्या  प्रसंगांना व कठीण काळाला समोर डगमगून न जाता जनतेमध्ये मोठे धैर्य व आत्मविश्वास जागवला. शासनाची किंवा इतर संस्थेची मदत येण्यापूर्वीच  पूरग्रस्तांना  अन्नाचे पाकीट व पाण्याची व्यवस्था करून दिली . शहर व परिसरातील गावे पूर्व पदावर येण्याकरता  रात्रंदिवस मेहनत घेतली. शासन  सामाजिक संस्था यांच्याकडून जास्त जास्त मदत आणण्यासाठी प्रयत्न केले व यशस्वी ठरले.
        
फेब्रुवारी 2021 रोजी  तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या  अध्यक्षतेखाली चिपळूण   बचाव समिती व वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत गाळ काढण्याच्या  महत्वपूर्ण विषयासंदर्भात  मंत्रालयात सरांच्या पाठपुराव्यामुळे  निर्णायक   बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने आदल्या दिवशीच सरांना तातडीने  उपचारासाठी मुंबईतील इस्पितळामध्ये ऍडमिट व्हावं लागले  परंतु सरांना  स्वतःवर होणाऱ्या उपचारापेक्षा  दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीचीच जास्त चिंता लागून राहिली होती सदर बैठकीमध्ये आपले शहर व परिसरातील गावे पुरमुक्त होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. सदर बैठकीला आपण काही करून जीवाची पर्वा न करता उपस्थित राहायचं असं ठाम निर्णय सरांनी केला होता . दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण  बचाव समिती व वरिष्ठ अधिकारी यांची मंत्रालय बैठक सुरू झाली  परंतु सदर बैठकीला सर न दिसल्यामुळे  आपली बाजू मांडणार कोण ह्या  चिंतेने बचाव समितीचे सदस्य ग्रासले होते. बैठक सुरू झाली  व बरोबर पंधरा मिनिटांनी  सर बैठकीचे ठिकाणी हजर झाले. परंतु त्यांचा अवतार बघून बैठकीमध्ये असलेले सर्वच जण अगदी अजितदादा पर्यंत  सगळेच अवाक झाले कारण सरांच्या डाव्या हाताला  सलाईन ची सुई  बँडेज मध्ये अडकवलेली होती व त्याचा प्लास्टिक पाईप हा लोंबकळत होता  तसेच उजव्या हाताला सुद्धा  इंजेक्शन नंतर लावलेल्या असंख्य पट्ट्या होत्या. हा सर्व प्रकार बघून अजित दादा भावुक  झाले  व वडीलधारी भावनेतून  सरांना ओरडून म्हणाले  'अरे शेखर का एवढी जोखीम घेतोस तू मी आहे ना इथे काळजी करू नकोस ! याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा अशा सक्त सूचना पी एस यांना केल्या. परंतु सरांनी सदर बैठकीतून जाण्यास विनम्रपणे  नकार दिला व संपूर्ण बैठक पूर्ण होईपर्यंत तिथेच थांबले.
       
याला म्हणतात नेता व नेतृत्व जो स्वतःच्या जीवापेक्षा  नागरिकांच्या जनतेच्या समस्याला प्राधान्य देतो. दिखाव्याला नाही !

शब्दांकन/ संकलन  - विलास गुरव

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत