#Yavat दौंड तालुक्यात महाआरोग्य शिबीरा चे आयोजन
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या संकल्पनेतून व कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री. बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
या महाआरोग्य शिबीरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा अशी विनंती आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली आहे.
यापूर्वी देखील २०१७ ते २०२० अशा सलग ४ वर्षी हे शिबीर घेण्यात आले होते. तसेच कोविड - १९ च्या कालावधीत आमदार अॅड. राहुल कुल यांनी पुढाकार घेऊन सुमारे २०० व्हेंटीलेटर बेड व १०० बेडचा विलगीकरण कक्ष असे ३०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर चौफुला परिसरात सुरु केले होते. त्यामध्ये सुमारे ३५०० हून कोविडबाधित गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आमदार अॅड. राहुल कुल यांनी आतापर्यंत दौंड तालुक्यासह राज्यभरातील अनेक रुग्णांना शासनच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तपासणी ते संपूर्ण उपचार अशा प्रकारचे हे शिबीर असून, सर्व गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अॅड. राहुल कुल यांनी केले आहे.
Comments
Post a Comment