गाव विकास आणि पक्ष संघटन मजबूत करा,माझ्याकडे प्रत्येकाचे स्वागतच असेल - आ.शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील निनावे रामवाडी,नारकरवाडी व ओझरे बु.गावातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला.जनसंपर्क कार्यालय,सावर्डे येथे आमदार श्री.शेखर निकम यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी प्रवेश करत आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला.पक्ष प्रवेशाचे नेतृत्व श्री.मारुती घवाळी यांनी केले.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे स्वागत करत,गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले."पक्ष वाढीसाठी आणि गावाच्या विकासासाठी एकत्र काम करू,माझे पूर्ण सहकार्य तुमच्यासोबत असेल," असे श्री.निकम सर यांनी ग्रामस्थांना सांगितले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये निनावे रामवाडी व नारकरवाडी येथील मारुती घवाळी (ग्रामपंचायत सदस्य),विश्राम नारकर,प्रभाकर नारकर,तुकाराम नारकर,सुरेश नारकर,एकनाथ नारकर आणि सुनिल कदम यांचा समावेश होता.ओझरे बु.गावातील विनायक शेट्ये,महेश गुरव,संदीप हातीम,रोशन जाधव,तेजस हातीम,प्रकाश हातीम आणि केतन हातीम यांनीही पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी संतोष कांबळे,अशोक कांबळे,जितेंद्र शेट्ये,अक्षय कांबळे,प्रसाद कांबळे,नितीन भोसले,मंगेश बांडागळे आणि रामू पंदेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments