Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun संगमेश्वर तालुक्यातील संरद ग्रामदैवत नवरात्रोत्सव सोहळ्यास प्रारंभ


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संपूर्ण महाराष्ट्रात हिंदु संस्कृती परंपरेनुसार कोकणातील शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. संगमेश्वर तालुक्यातील संरद ग्रामदैवत असलेले श्री.वाघजाई देवी. श्री.नवलाई देवी.श्री.पावनाई देवी. श्री.चंडकाई देवी.श्री.केदार देव या देव-देवीची विविध अलंकार परिधान करून प्राचीन परंपरेनुसार सरंद गुरववाडी येथे गाव देव घरांमध्ये घट माडले जातात. घटस्थापनेपासुन दसरा सणापर्यंत नवरात्र उत्सव लहान थोर, ग्रामस्थ मंडळी गुण्या गोविंदाने भक्तिमय वातावरण अंत्यंत उत्साहात साजरा करत असतात. प्रत्येक दिवशी संध्याकाळी महा आरतीनंतर भजन, जाकडी नृत्य, महिलांचे विविध कार्यक्रम तसेच तरुण- तरुणी गरबा डान्स त्यामध्ये वयस्कर महिला-षुरूष यांचाही सहभाग असतोच.तसेच आलेल्या भक्तांना गाव देवी ग्रामस्थ मंडळीकडून चहा,नाष्टा यांची व्यवस्था करण्यात येते. असे नऊ दिवस भक्तिभावाने आपल्या गावदेवीची सेवा करण्यात येते.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक श्रेत्रातील मंडळी सुध्दा गावदेवी दर्शन घ्यावयास येत असतात. सर्व इतर शेजारीच गावातील मंडळीनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरंद ग्रामदैवत ग्रामस्थ मंडळींकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments