Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुते - बारामती एसटी बसेस वेळेवर सोडण्याची सतीश सपकाळ यांची मागणी



महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते सह परिसरात गावातून बारामती या ठिकाणी नोकरीसाठी, शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी व व्यवसायासाठी अनेक नागरिक एसटी बसेसने बारामती ते नातेपुते ये जा करीत असतात परंतु नातेपुते वरून बारामती ला जाणाऱ्या एसटी बसेस एक दिवसही वेळेवर सोडल्या जात नाहीत त्यातच सदर मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्या दोन ते तीन दिवसाला रद्द केल्या जात असल्याने व त्यामुळे महिलांची, शिक्षण घेणाऱ्या मुलींची, जेष्ठ नागरिकांची खूप हेळसांड होत आहे एसटी बसेस वेळेत न सोडल्यामुळे व वारंवार रद्द केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून नातेपुते वरून जाणारी १२:४५ वाजता म्हणजेच बारामतीला दोन वाजेपर्यंत पोहोचणारी व बारामती वरून सायंकाळी ६ वाजता म्हणजेच नातेपुते वरून चार पंचेचाळीस वाजता ची बस या दोन्ही बस वरील वेळेला दररोज प्रवाशांच्या सोयीसाठी असल्या पाहिजेत व इतर वेळेत सोडणाऱ्या  बसेस  सुद्धा चालू राहिल्या पाहिजेत अशी मागणी माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सतीश सपकाळ यांनी अकलूज एसटी डेपोचे आगारप्रमुख प्रमोद शिंदे यांच्याकडे दिनांक १५ ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी आगार प्रमुख प्रमोद शिंदे, नातेपुते एसटी कंट्रोल नाईकनवरे, राजू वनवे, विनोद लांडगे, कांतीलाल समिंदर, शंकर डफळ,बाळासाहेब साळवे आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments