Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute धर्मपुरी केंद्र शाळेचा चैतन्य भुजबळ वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम


महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत विध्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धेतील माळशिरस तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मपुरी चा चैतन्य ज्ञानदेव भुजबळ हा विध्यार्थी माळशिरस तालुक्यात प्रथम आला.

                           Advertisement 

नातेपुते येथे विद्यार्थी टॅलेंट हंट  स्पर्धेतील माळशिरस तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा प्रदीपजी करडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते केंद्राचे केंद्र प्रमुख श्री प्रशांत सरुडकर सर यांनी या स्पर्धेचे नियोजनबद्ध आयोजन केले होते.लहान आणि मोठ्या गटासाठी तज्ञ अशा परीक्षकांची नेमणूक करुन स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.स्पर्धेसाठी श्री करमाळकर सर, श्री परचुंडे सर, श्री लोंढे सर ,बुधावले सर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे बक्षिस वितरण तालुक्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुषमा महामूनी मॅडम तसेच केंद्र प्रमुख टोणपे मॅडम, केंद्र प्रमुख झेंडे सर यांच्या हस्ते झाले.

चैतन्य भुजबळ या धर्मपुरी शाळेतील विद्यार्थ्यांने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळण्याबरोबरच कथाकथन स्पर्धेत ही यश मिळविले.तसेच धर्मपुरी केंद्रातीलच जि प प्राथमिक शाळा जाधव वस्ती ची कु तनिष्का पाटील हीने ही लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला.
   
त्यांच्या या यशाबद्दल केंद्र प्रमुख झेंडे सर, पत्रकार लोंढे सर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच शिक्षक- पालक व ग्रामस्थ यांनी त्यांचे कौतुक करुन जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments