Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat कडेठाण येथील सांजोबा महाराज यात्रेची तयारी पूर्ण


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील कडेठाण  गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री सांजोबा महाराज यात्रा उत्सव रविवार दि २० ऑक्टोबर व सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. रविवारी पहाटे ५.३०वा.
देवाची पूजा होणार असून दुपारी १२.०० वा. मानाची काठी निघणार आहे. सायंकाळी ६.०० वा. देवाची पालखी मिरवणूक फटाक्यांच्या अतिशबाजीत  छबीन्याचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी बारा गावच्या बारा अप्सरा यांचा लावण्याचा  कार्यक्रम होईल.सोमवारी सकाळी ६.०० वा. पालखी वाजत गाजत गावातील हनुमान मंदिरामध्ये आणली जाते.
सोमवारी सकाळी ९.०० वा रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळ यांचा हजेरीचा कार्यक्रम होईल. दुपारी ३.०० वा. संजोबा देवाची पालखी छबीना पारंपरिक वाद्याच्या गजरात संपूर्ण गावात मिरवणूक होणार आहे. रात्री ८.००वा. करमणूकसाठी रघुवीर खेडकर तमाशा मंडळाचा कार्यक्रम होईल.असे यात्रा कमिटी कडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments