#Baramati चंदुकाका सराफ सुवर्णपेढीमध्ये साजरा केला पुरुष दिन


महादरबार न्यूज नेटवर्क -
चंदुकाका सराफ या १९८ वर्षांच्या शुद्ध सोन्यासाठी परंपरा जपणाऱ्या सुवर्णपेढीमध्ये पुरुष दिन साजरा करण्यात आला. बालदिन, ज्येष्ठ नागरिक दिन, महिला दिन आपण साजरा करतो मात्र पुरुष दिन बहुतांशी साजरा केला जात नाही.


आयुष्यभर राब-राब राबणाऱ्या हातांना कुठेतरी थोडसं सुख मिळावं, कौतुक व्हावं, आणि आपल्या जीवनात प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवून चंदुकाका सराफ या सुवर्णपेढीने बारामती परिसरातील मुथा क्लासेसचे श्री रमेश मुथा, दातांचे प्रसिद्ध डॉक्टर अभिषेक घुले, प्रसिद्ध गायक सुरेश हिटे,उद्योजक मुनीर तांबोळी, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश नालंदे, माजी सैनिक दत्तात्रय हाके व आनंदराव शिंदे, ऑल केमिस्ट स्पोकन अकॅडमी चे प्रकाश पानसरे, आनंदा कर्चे, जेसीबी शोरूम चे मॅनेजर संजय पाटील व दादासाहेब देवकाते, उद्योजक राजू मेथा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना खास निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्यातील नकारात्मक प्रतिमा दूर करून आपण सकारात्मकतेकडे कायम वाटचाल करत रहा व कसोटीने स्वच्छ चारित्र्याने आपण काम केल्यास समाजात न होते अशा पद्धतीचे मत प्रसिद्ध गायक सुरेश हिटे यांनी मांडले. या सुवर्णपेढीमध्ये सध्या विवाह तस्मे हा महोत्सव चालू असून यामधील लग्नाच्या विविध व
व्हरायटीज उपलब्ध असून याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले.

यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर शुद्ध सोन्याची परंपरा लाभलेल्या या सुवर्णपेढीचे चेअरमन  यांचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध यशस्वी उद्योजक म्हणून उपस्थित मान्यवरांनी व सेल्स हेड श्री दीपक वाबळे सर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन म्हणून मार्केटिंग विभागाचे प्रमुख कुलदीप बावणे व कुमार राठोड, सेल्स हेड श्री दीपक वाबळे ब्रांच मॅनेजर रोहित आवदे, शुक्लेश्वर जगताप, कुलदीप जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन मार्केटिंग विभागाचे विनोद जगताप व सचिन मोहिते यांनी केले व सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत